नवी मुंबई सर्वोत्तम शहर

नवी मुंबई सर्वोत्तम शहर

Published on

नवी मुंबई सर्वोत्तम शहर
सुपर स्वच्छ लीगमध्ये राज्यातील एकमेव शहर

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : सलग तीन वर्षे राज्यातून पहिल्या आणि देशात तिसऱ्या व दुसऱ्या क्रमांकावर झेप घेणाऱ्या नवी मुंबई शहराने पुन्हा एकदा स्वच्छता स्पर्धेत बाजी मारली आहे. यंदा स्पर्धेत बदललेल्या गुणांकन पद्धतीमुळे वारंवार क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबई शहराचा सुपर स्वच्छ लीगमध्ये समावेश झाला आहे. राज्यातून समावेश होणारे नवी मुंबई हे एकमेव शहर ठरले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या शिरपेचात पुन्हा एकदा सुपर लीगचा तुरा खोवला गेला आहे.
शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने या वर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’करिता गुणांकन पद्धती बदललेली असून, ‘सुपर स्वच्छ लीग’ ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण केली आहे. स्वच्छतेत नेहमीच अग्रभागी असणाऱ्या शहरांऐवजी इतरही शहरांना क्रमवारीत पुढे येण्याची संधी मिळावी, या दृष्टीने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’पर्यंत जी शहरे लागोपाठ तीन वर्षे किमान दोन वेळा टॉप थ्रीमध्ये आहेत, अशा शहरांसाठी ‘सुपर स्वच्छ लीग’ ही क्रमवारीपेक्षा उच्च अशी विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईला सुपर स्वच्छ मानांकन जाहीर झालेले आहे. नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजयपताका अक्षय फडकत ठेवली आहे.
...
नवी दिल्लीत सन्मान
कचरामुक्त शहराचे सर्वोच्च ‘सेव्हन स्टार मानांकन’ तसेच ओडीएफ कॅटेगरीमध्ये सर्वोच्च ‘वॉटरप्लस’ मानांकन नवी मुंबईने कायम राखले आहे. नवी मुंबईच्या या सातत्यपूर्ण स्वच्छता कार्याचा सन्मान नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ पारितोषिक वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, केंद्रीय गृहनिर्माण न शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यमंत्री तोखन साहू व सचिव श्रीनिवास करिकीथाला यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ व नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वीकारला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व स्मिता काळे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर तसेच विशेषत्वाने प्रातिनिधिक स्वरूपात दोन स्वच्छतामित्र व दोन स्वच्छतासखीदेखील उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com