अकरावीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत केवळ 79 हजार विद्यार्थ्यांना अलोटमेंट

अकरावीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत केवळ 79 हजार विद्यार्थ्यांना अलोटमेंट

Published on

अकरावीची दुसरी यादी जाहीर
तब्बल १.९१ लाख जागा रिक्त
मुंबई, ता. १७ : अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. त्यात मुंबई विभागात उपलब्ध असलेल्या एकूण दोन लाख ७१ हजार ६० जागांपैकी केवळ ७९ हजार ४०३ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश अलोटमेंट झाले आहेत. तर उपलब्ध असलेल्या जागांपैकी तब्बल एक लाख ९१ हजार ६५७ जागा या फेरीमध्ये रिक्त राहिल्या असल्याने प्रवेश प्रक्रिया पुढील अनेक दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय ३७ हजार ४८५ विद्यार्थ्यांना मिळाले आहे, तर दुसऱ्या पसंतीक्रमातील १३,१७७ विद्यार्थ्यांना आणि तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय केवळ ८,९६० विद्यार्थ्यांना मिळाले आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवसांत संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन आपले प्रवेश घेणे बंधनकारक असेल. तर इतर पसंतीक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नको असल्यास त्यांना तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याची मुभा असेल. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एकदा विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्यास त्याला पुढील सर्व फेऱ्यांमध्ये प्रवेशासाठी प्रतिबंध केला जाणार आहे.
---
मंडळनिहाय एकूण प्रवेश
मंडळ एकूण प्रवेश
राज्य शिक्षण मंडळ ७१,३९१
सीबीएसई ३,२६२
आयसीएसई ३,१५४
आयबी ५
आयजीसीएसई ३७६
एनआयओएस २२१
इतर ९९४
एकूण ७९,४०३
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com