मुंबई
कळंभे शाळेत सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण
मुरबाड (वार्ताहर) : तालुक्यातील कळंभे ही मुरबाड ग्रामीण भागातील शाळा आहे. या शाळेत मालती वैद्य स्मृती ट्रस्ट यांच्या सहकार्याने सौर प्रकल्प पूर्ण करण्यात आला. आजपर्यंत या संस्थेने मुरबाड तालुक्यात अनेक शाळांमध्ये नेट मिटरिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली. मालती वैद्य स्मृती ट्रस्टचे प्रमुख महाजन आणि प्रकल्पास सर्व प्रकारची तांत्रिक मदत करणारे प्रसाद बोंडस यांनी हा प्रकल्प पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे शाळेची वीजबिलातून सुटका होणार आहे. या संस्थेला आवश्यक ते सहकार्य कळंभे शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक अविनाश सुरोशे, शिक्षकांनी केले.