नवीन जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे काम युद्ध पातळीवर सुरु
नवीन जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे काम युद्ध पातळीवर सुरु
विरार, ता. १९ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे काम भूमिपूजनानंतरही पोच रस्ता, संरचना आराखडा यासह इतर तांत्रिक अडचणींमुळे धीम्या गतीने सुरू होते. मात्र, आता सर्व अडचणी दूर झाल्यानंतर या कार्यालयाच्या बांधकामाला गती मिळाली असून युद्ध पातळीवर हे काम करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
वसई पूर्वेच्या गोखीवरे येथील सर्व्हे क्रमांक २३३/अ/१ व ४ या तीन हेक्टर जागेत पालघर जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाची इमारत ही दोन मजली असून यात २४ हजार ९१२ चौरस फुटांचे बांधकाम त्यात केले जाणार आहे. यासाठी सुमारे १३.९७ कोटी इतका निधी खर्च केला जाणार आहे. मात्र, भूमिपूजनानंतर आरसीसी संकल्पनाची कन्सल्टंट करून तपासणी, १२ मीटर लांबीचा पोहच रस्ता, यासह इतर तांत्रिक अडचणींमुळे काम बंद होते. डिसेंबर २०२४ मध्ये सर्व अडचणी दूर झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक स्लॅब पडला असून दुसराही टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण इमारतीचे आरसीसी स्ट्रक्चरचे काम पूर्ण केले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत ४० टक्के इतके काम पूर्ण झाले असून त्या कामाला आणखीन गती देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय यादव यांनी सांगितले आहे. नवीन प्रादेशिक कार्यालयाचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. वेळोवेळी त्या कामाचा आढावा घेतला जात आहे. एप्रिल ते मे यादरम्यान त्या कार्यालयात जायला हवे, असे आमचे उद्दीष्ट आहे, असे वसईच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी म्हंटले आहे.
सद्यस्थितीत अपुऱ्या जागेत कामकाज
प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सध्या विरारच्या चंदनसार (भाटपाडा) येथे भाड्याच्या जागेत सुरू आहे. अपुरी जागा, धोकादायक अवस्थेत असलेली इमारत, सोयी-सुविधांचा अभाव अशा अनेक अडचणी येथे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.