कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
माणगांव, ता. १९ (बातमीदार) : कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईतर्फे माणगांव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदच्या ५३ शाळांना आणि ६० अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शेअरिंग अँड सर्व्हिंग पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चेन्नई, आवरनेस ग्रुप मुंबई, स्वयं फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यातर्फे हा कार्यक्रम राबविण्यात आला.
माणगाव तालुक्यातील एकूण ५३ जिल्हा परिषद शाळांतील एक हजार ८० विद्यार्थी तसेच ६० अंगणवाडी शाळांतील ६१० विद्यार्थ्यांना ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये रा. जि. प. शाळा देवळी, मूर, भिंताड, नागाव, चिंचवली, लोणेरे, पहेल, नवघर, उसरघर, न्हावे, पन्हळघर खु., झोरेवाडी, पन्हळघर बु., आवाप. बु., वाघोसे, गारळ, जावळी, लोणशी, वावे, उणेगाव, चापडी, वडगावकोंड, कुरवडे, शिरवली, दहिलीकोंड, देगाव, रिले, खर्डी बु., खर्डी बु. आ. वाडी, राजिवली, सुरव/तळे, खरवली, पेण, उमरोली/खरवली कोशींबल, दाखणे, विघवली, कुशेडे/तळे, मुठवली, माकटि, माकटि आ. वाडी, कालवण, साळवे, होडगाव, मढेगाव, मढेगांवकोंड, केस्तुली, हरकोलकोंड, रानवडेकोंड या शाळांतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला समाज कुणबी समाजोन्नती संघ, परेल मुंबई अध्यक्ष नीलेश बाळकृष्ण तळवटकर, स्वयं फाउंडेशन अध्यक्ष सुनील शिंदे, ॲड. वैभव गोसावी, शेअरिंग अँड सर्व्हिस पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, चेन्नईचे रवि जाधव, कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक विश्वस्त नीलेश सत्वे, प्रकाश मोरे, भारत उंडरे, संतोष आवाद, अशोक पालकर, प्रदीप अडीत, मदन आवाद, दिलीप मोरे, महेश महादे, संदीप ढेपे, नितीन शिंदे, नितीन कासरेकर, ज्ञानेश्वर मोरे, सुभाष तेटगुरे, विदेश चेरफळे, महेंद्र वाघोस्कर, विश्वनाथ मुंडे, नरेश कालेकर, श्रुती कालेकर, पुरुषोत्तम चिमण, विद्यार्थी पालकवर्ग मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका आणि इतर सहकारी शिक्षिका, शिक्षक, सरपंच, पोलिस पाटील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
फोटो -
कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईतर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि वह्या वाटप करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.