नवी मुंबईच्या वेशीवर रिक्षा चालकांंकडून लूट

नवी मुंबईच्या वेशीवर रिक्षा चालकांंकडून लूट

Published on

नवी मुंबईच्या वेशीवर रिक्षाचालकांंकडून लूट
पाच रुपयांची वाढ करून मनमानी भाडे आकारणी
वाशी, ता. २१ (बातमीदार) ः ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवरील दिघा विभागातून ठाण्याकडे जाणाऱ्या मुकुंद कंपनी ते ईश्वरनगर मार्गे अनंतनगर आणि मुकुंद कंपनी ते वाघोबानगर येथे जाणाऱ्या रिक्षाचालकांनी मागील आठवडाभरापासून मनमानीपणे प्रवासी भाड्यात पाच रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे अवघ्या अर्धा किलोमीटरसाठी प्रवाशांची लूट सुरू आहे. विशेष म्हणजे ही भाडेवाढ आरटीओने केलेल्या कारवाईनंतर करण्यात आली आहे. याबाबत नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
नवी मुंबई महापालिका हद्दतील प्रभाग १ व २ वरील मार्गावरून मुकुंद कंपनी ते ठाण्यातील कळवा पूर्व परिसरातील अनंतनगर व वाघोबानगर येथे शेअर रिक्षा चालविल्या जातात. मागील अनेक वर्षांपासून जुनाट आणि भंगार अवस्थेतील रिक्षा या मार्गावर धावतात. तर रिक्षाचालकांकडे लायसन्स, कागदपत्रे नसतानाही अनेक गाड्या बेकायदा पाच-पाच प्रवाशांची वाहतूक करतात. अशाप्रकारे रिक्षाचालकांकडून मागील अनेक वर्षांपासून नियमबाह्य पद्धतीने वाहतूक सुरू असतानाच जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आरटीओ आणि वाहतूक शाखेची परवानगी न घेता रिक्षाचालकांनी मनमानीपणे मुकुंद ते अनंतनगर १० ऐवजी १५ रुपये, मुकुंद ते वाघोबानगर, दुर्गा मंदिर १५वरून २० रुपये भाडे केले आहे. रिक्षाचालकांनी मनमानीपणे भाडेवाढ केली असल्याने प्रवासीवर्गातून नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. त्यामुळे अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरासाठी प्रवाशांना ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. दरम्यान, मुकुंद कपंनी ते वाघोबानगर या मार्गावर आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांची कोणतीही परवानगी नसताना स्थानिक राजकीय नेत्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने जागोजागी बेकायदा शिक्षा स्टॅण्ड उभारण्यात आले आहेत. त्यावर कारवाई करावी, शेअर रिक्षांऐवजी या ठिकाणी मीटरच्या रिक्षा सुरू कराव्यात, रिक्षाचालकांना गणवेश सक्तीचा करावा, लायसन्स व कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या रिक्षा तातडीने जप्त कराव्यात, तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com