धोकादायक पाण्याच्या टाकीमुळे भीतीचे वातावरण
धोकादायक पाण्याच्या टाकीमुळे भीतीचे वातावरण
एपीएमसीतील बाजार घटकांकडून पाडण्याची मागणी
जुईनगर, ता. १९ (बातमीदार) : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धोकादायक वास्तूंचे प्रमाण वाढतच जात आहे. बाजार समिती उभी करीत असताना येथील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सिडको प्रशासनाकडून २४ वर्षांपूर्वी पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. दरम्यान, ही टाकी आता धोकादायक झाली असून, मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत सिडको आणि महापालिका ही दोन्ही प्रशासने कोणतीच कार्यवाही करीत नसल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे.
बाजार समितीमधील मसाला मार्केटजवळ असलेल्या मध्यवर्ती सुविधा इमारत क्रमांक २च्या परिसरात ही जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडण्याची मागणी महापालिकेकडे बाजार घटकांकडून केली जात आहे. दरम्यान, दोन्ही प्रशासनांकडून दुर्लक्ष केले जात आहे. धान्य आणि मसाला मार्केटमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी या टाकीची बांधणी करण्यात आली होती. परंतु पाण्याच्या टाकीचा वापर आजतागायत झालेला नाही. त्यामुळे या टाकीचे बांधकाम जीर्ण झाले असून, तिला मोठमोठे तडे गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी टाकी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टाकी कोसळल्यास मसाला आणि धान्य मार्केटचा गजबजलेला चौक, जवळची मर्चंट चेंबर इमारत, कोपऱ्यावरील पोलिस चौकी या घटकांना मोठा धोका निर्माण होणार आहे. या घटनेत निष्पाप बळी जाण्याची भीती संपूर्ण बाजार घटकाला सतावत आहे.
...........
२० वर्षांपासून टाकी धूळखात
टाकी असलेल्या आवारात मध्यवर्ती इमारतीचा तळमजला सिडको प्रशासनाच्या मालकीचा आहे. या परिसरात बाजार समिती प्रशासनाने वर्ष २००० रोजी जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून भव्य पाण्याची टाकी बांधली होती. ही जागा सिडकोच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे पाण्याची टाकी बांधल्याची नोंद सिडको अथवा महापालिका या दोन्ही आस्थापनांकडे नसल्याचे सांगण्यात येत आहे. बाजार समिती प्रशासनाने टाकी बांधण्यापूर्वी जागेची व बांधकामाची परवानगी न घेता टाकी उभा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन कोटी खर्च करून बांधलेली पाण्याची टाकी अद्याप वापराविना धुळखात पडून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.