सप्टेंबरपासून रेशन बंद होणार

सप्टेंबरपासून रेशन बंद होणार

Published on

सप्टेंबरपासून रेशन बंद होणार
८८ हजार २९४ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित
पनवेल, ता. १९ (बातमीदार) ः सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेतील जे लाभार्थी ई-केवायसी करणार नाहीत, त्यांचे सप्टेंबर २०२५पासून धान्य वितरण बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली असतानाही तालुक्यात जवळपास ८८ हजार २९४ लाभार्थी अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत त्यांनी तत्काळ ती करून घ्यावी, असे आवाहन पनवेल तालुका पुरवठा अधिकारी अश्विनी धनवे यांनी केले आहे. यापूर्वीच शासनाने तीन वेळा मुदतवाढ देऊनही तालुक्यातील ८८ हजार २९४ लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे. शासनाकडून आता शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ जुलै २०२५पर्यंत ई-केवायसी न झाल्यास सप्टेंबर २०२५ पासून अशा लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार आहे. ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांनी ई-केवायसीकरिता आपल्या रास्त भाव दुकानात आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी किंवा अशा लाभार्थ्यांसाठी शासनाचा ‘मेरा केवायसी’ ॲप सुरू आहे, त्याद्वारे ई-केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.
......................
चौकट
लाभार्थी स्वतः जबाबदार
स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत तसेच विविध माध्यमांद्वारे सूचित करूनही काही लाभार्थी ई-केवायसी करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सूचना देऊनही ई-केवायसी करण्यास ते दुकानात येत नाही, अशी खंत तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व्यक्त करतात; मात्र कमी ई-केवायसीकरिता स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावरच जबाबदारी निश्चित होणार असल्याने सर्व लाभार्थ्यांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करून रास्त भाव दुकानदार तसेच शासनास सहकार्य करावे, असे सांगण्यात येत आहे. सप्टेंबरपासून अशा लाभार्थ्यांचे धान्य बंद झाल्यास त्याला लाभार्थी स्वतःच जबाबदार राहतील, अशी ताकीद पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
...............
चौकट
पनवेल तालुक्यातील शिधापत्रिकाधारक
३ लाख ४ हजार ९६६
ई-केवायसी झालेले शिधापत्रिकाधारक
२ लाख १६ हजार ६७२
ई-केवायसी करायचे राहिलेले शिधापत्रिकाधारक
८८ हजार २९४
.......................
तालुक्यात ई-केवायसी झालेले ७१.०५ टक्के
ई-केवायसी करायचे राहिलेले २८.९५ टक्‍के
................

कोट
शिधापत्रिकाधारकांनी ३१ जुलैपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी न झालेल्या व्यक्तींची यादी प्रत्येक शिधावाटप दुकानदारांना कार्यालयाद्वारे पुरविण्यात आलेली आहे. या महिन्याअखेरपर्यंत केवायसी न केलेल्या शिधापत्रिकाधारकाचे धान्य बंद होणार आहे व त्यासाठी शिधापत्रिकाधारक जबाबदार राहतील.
- अश्विनी धनवे, तालुका पुरवठा अधिकारी, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com