संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमा महोत्सव

संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमा महोत्सव

Published on

घाटकोपर (बातमीदार) : विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक गुरुवर्य दिवंगत प. म. राऊत यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त डॉ. वा. शं. मटकर संगीत विद्यालयाच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात गायन, वादन, नृत्य या तिन्ही कला प्रकारांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. १९८३ सालापासून ही परंपरा कायम आहे. संगीत विद्यालयाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला यानिमित्ताने सादर करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुरुपूजन सोहळ्याअंतर्गत संगीत विद्यालयाचा गुरुजनवर्ग तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अभिनेते सचिन गोस्वामी यांनी गुरुतत्त्व, मनुष्य जीवनात कलेची आवश्यकता, कला शिक्षणातील गुरुकिल्लीचे महत्त्व अधोरेखित करीत कला ही केवळ उपजीविकेचे साधन नसून, ती माणसाला खऱ्या अर्थाने जगायला शिकवते, असे विचार व्यक्त केले.

Marathi News Esakal
www.esakal.com