मुंबई
मुलुंडमध्ये मंगळा गौरची स्पर्धा
मुलुंड (बातमीदार) : रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी थोडा वेळ काढून सख्यांसोबत खेळ, गाणी आणि गप्पा याचा आनंद महिलांना घेता यावा, या हेतूने ‘थाट मंगळागौरीचा, गोफ स्त्रीशक्ती’चा ही स्पर्धा मुलुंड भाजपतर्फे होणार आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष व आमदार मिहिर कोटेचा यांच्याद्वारे सलग तीन वर्षे ही स्पर्धा भरवण्यात येते. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे. तसेच ८८२८३०३५४६ या क्रमांकावर ग्रुप फोटो पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.