शहाडमध्ये एकाच जमिनीचा दोनदा व्यवहार

शहाडमध्ये एकाच जमिनीचा दोनदा व्यवहार
Published on

शहाडमध्ये एकाच जमिनीचा दोनदा व्यवहार
१५हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : शहाड परिसरातील सर्व्हे नंबर २७/१/अ या जमिनीचा बनावट कागदपत्रांच्या आधारे दोनदा व्यवहार केल्याच्या प्रकरणात १५हून अधिक जणांवर खडकपाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन मूळ मालक शनिवार ढोणे यांच्या नावावर आहे. त्यांचे १९९९ मध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूपूर्वीचे बनावट खरेदीखत तयार करून वसंत केशव भोईर यांनी उल्हासनगर तहसील कार्यालयात खोटी नोंद करून सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव चढवले, अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर ढोणे कुटुंबीयांनी यासंबंधी चौकशी केली असता, सदर दस्तऐवज खोटे आणि बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे वसंत भोईर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती.

२ नोव्हेंबर २०१८ रोजी ढोणे कुटुंबीयांनी एका विकसकासोबत समझोता करार केला होता; मात्र वसंत भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी डावखर ग्रुपचा करार रद्द करून नवीन विकसकासोबत जास्त पैशांचे प्रलोभन दाखवून नव्याने करार करावा, असा दबाव टाकला. १६ मे २०२५ रोजी नवा करार केला. फसवणुकीची जाणीव झाल्यावर डावखर ग्रुपचे कार्यकारी संचालक सचिन चौधरी यांनी २०१८ चा मूळ करारनामा खडकपाडा पोलिस ठाण्यात सादर केला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाघमोडे आणि तपास अधिकारी भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत भोईर, मुख्य सूत्रधार भारवी भोईर (फरार), तसेच मूळ जमीनमालकाचे नातेवाईक बेबीबाई ढोणे, गणेश ढोणे, कृष्णा ढोणे, रंजीता ढोणे, अर्चना ढोणे, यांच्यासह विनायक कोट, सुषमा भगत, विजय कोट, मीना पाटील, शारदा तरे व बिल्डर माळकर, काळण, झोळंबेकर आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून सर्व आरोपींचा शोध सुरू असून, इतर कोणाचीही गुन्ह्यात भूमिका आहे का, याचाही तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com