मुंबई
धरती आबा जनजातीय ग्राम अभियानाबाबत जागृती
जव्हार (बातमीदार) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाबाबत जनजागृतीसाठी जव्हार येथे कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत सरपंच आणि महिला बचत गटांनी सहभाग घेतला. अभियानांतर्गत १७ मंत्रालयांमार्फत २५ योजना राबविण्यात येणार असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचा उद्देश आहे. कार्यशाळेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके, सुभाष परदेशी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले. प्रास्ताविक तिरुपती सांगवीकर, तर सूत्रसंचालन एस. जे. शेवाळे यांनी केले.