थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

वडघर मुद्रे येथे रानभाजी प्रदर्शनाला प्रतिसाद
माणगाव, ता. २१ (बातमीदार) ः छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे विद्यालयात शुक्रवारी (ता. १८) रानभाजी प्रदर्शन पार पडले. या रानभाजी प्रदर्शनात विद्यालयातील २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. १३ रानभाज्या या प्रदर्शनात मांडल्या होत्या. विविध रानभाज्यांची माहिती सहभागी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सांगितली. माहितीसाठी विद्यार्थ्यांनी रानभाज्या माहिती देणारे भित्तिपत्रक तयार केले होते. तसेच या रानभाज्यांची वैशिष्ट्यपूर्ण असलेली चव मिळावी, यासाठी सर्व रानभाज्या विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून तयार करून, बनवून आणल्या होत्या. रायगड जिल्ह्याच्या वनांमध्ये सुमारे पन्नासहून अधिक रानभाज्या पावसाळ्यात उपलब्ध होतात. या रानभाज्यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, तसेच रानभाज्यांचे औषधी गुणधर्म विद्यार्थ्यांना कळावे यासाठी विद्यालयात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे औषधी गुणधर्म संदर्भासहित सांगितल्याने शिक्षक, मान्यवरांनी सर्वांचे कौतुक केले. या रानभाजी प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे वैशिष्ट्य त्यांचे गुणधर्म व त्यांची उपयुक्तता सांगितली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या रानभाज्या बनविण्याची पद्धत तसेच प्रत्यक्ष रानभाज्या बनवून प्रदर्शनात मांडल्याने याची चव अनेकांना घेता आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन पाटील यांनी या रानभाज्यांची वैशिष्ट्ये, गुणधर्म व उपयुक्तता याबाबत विद्यार्थ्यांना माहिती करून दिली.
....................
देवळी ग्रामस्थांचा निसर्ग संवर्धनाचा ठाम निर्धार
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव तालुक्यातील देवळी गाव, देवळी कोंड व देवळी ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच विनेश डवले यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, देवळी मुंबईकर मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, शाळेचे विद्यार्थी तसेच गावातील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमात देवळी गाव व देवळी कोंड येथील ग्रामस्थ, तसेच मुंबईत राहणाऱ्या गावकऱ्यांनी मिळून ३५० झाडांची लागवड केली. केवळ झाडे लावणे नव्हे तर ती जगवून त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत संगोपन करणे, हा संकल्प सर्व ग्रामस्थांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, मुंबईहून विशेषतः या उपक्रमासाठी आलेल्या तरुण मंडळाचे आणि सध्या शेतावर लावणीची कामे सुरू असतानाही कार्यक्रमाला हजर राहिलेल्या शेतकरी व महिलावर्गाचे मनापासून आभार मानण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com