बोगस पिकविमा काढणाऱ्यांविरोधात आता कारवाई
बोगस पीक विमा काढणाऱ्यांविरोधात आता कारवाई
कृषी विभागाचे आवाहन; आधार कार्ड काळ्या यादीत
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) ः राज्यातील काही ठिकाणी बोगस पीक विमा उतरवण्याचे प्रमाण वाढले आहे. विमा कंपनीने केलेल्या तक्रारीनंतर कृषी विभागाने प्रत्यक्षात केलेल्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळेच बोगस कागदपत्रांच्या आधारे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांसह सामान्य सेवा केंद्रावर थेट गुन्हा नोंदवला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे आधार क्रमांक काळ्या यादीत टाकले जाणार आहेत. त्याचप्रमाणे पाच वर्षांपर्यंत योजनेचा लाभ नाकारला जाईल. त्यामुळे बोगस पीक विमा उतरवून देतो, असे सांगणाऱ्या दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळते, मात्र या योजनेचा गैरफायदा काही बोगस शेतकरी उचलत आहेत. खोटी कागदपत्रे बनवून पीक विमा उतरवला जातो. यामध्ये काही सामान्य सेवा केंद्राचे चालकही गुंतलेले दिसून येत आहेत. शासनाची फसवणूक करण्याचा डाव लक्षात आल्यानंतर शासनाने गांभीर्याने दखल घेत कठोर निर्णय घेतला आहे. बोगस पीक विमा उतरवणे हा गुन्हा ठरतो. त्यामध्ये शासनाची फसवणूक होते. फसवणुकीबद्दल काही ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा सिद्ध झाल्यास कारावास, दंड होऊ शकतो.
रायगड जिल्ह्यात एक हजारहून अधिक सामान्य सेवा केंद्र कार्यरत आहेत. यापैकी काही ठिकाणी बोगस फळ विमा उतरविण्यात आला होता. बोगस पीक विमा उतरविणाऱ्या केंद्राच्या चालकावर कारवाईचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. सेंटरचा परवाना रद्द केला जाणार आहे. जिल्ह्यात गतवर्षी ६१२ शेतकऱ्यांनी जादा क्षेत्र दाखवून अथवा फळपीक नसताना कागदोपत्री विमा उतरविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कृषी विभागाने केलेल्या तपासणीत हे उघड झाले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना असे बोगस पीक विमा काढून देणाऱ्या सामान्य सेवा केंद्रावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. शिवाय बोगस पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड क्रमांक काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.