वीज वितरण परवान्यावर आज जनसुनावणी
वीज वितरण परवान्यावर आज जनसुनावणी
अदाणी, टोरंटचा अर्ज; महावितरणच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : महावितरणचे कार्यक्षेत्र असलेल्या परिसरात वीज वितरण परवाना मिळावा, म्हणून अदाणी इलेक्ट्रिसिटी, टोरंट पाॅवरने समांतर वीज वितरण परवाना मिळावा, म्हणून वीज नियामक आयोगाकडे अर्ज केले आहेत. त्यावर उद्या मंगळवारी २२ जुलै रोजी वीज आयोगासमोर ई-सुनावणी होणार आहे. त्यामुळे संबंधित कंपन्या काय बाजू मांडतात आणि महावितरण काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुलुंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबई परिसरात वीज वितरण परवाना मिळावा, म्हणून अदाणी इलेक्ट्रिसिटीने याचिका दाखल केली आहे, टोरंट पॉवरने एमएमआर क्षेत्रातील पाच महापालिका क्षेत्रात समांतर वीज वितरण परवान्यासाठी याचिका केली आहे. त्याची दखल घेत वीज नियामक आयोगाने संबंधित कंपन्यांच्या याचिकांवर उद्या मंगळवारी सकाळी सुनावणी ठेवली आहे. या ई-सुनावणीत इच्छुकांना सहभागी होता येणार आहे. दरम्यान, महावितरणच्या कार्यक्षेत्रात खासगी कंपन्यांनी वीज वितरण परवाना मिळावा म्हणून केलेल्या अर्जावर सामान्य ग्राहक, वीज कंपन्या यांची काय भूमिका आहे, हे स्पष्ट होणार आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यभरात महावितरणकडून वीजपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये घरगुती, औद्योगिक, वाणिज्य आणि कृषिपंपधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
...
महावितरणचे वांदे
महावितरणची ग्रामीण भागात मोठी वीजगळती आहे, कृषिपंपधारक वेळेवर वीजबिले भरत नाहीत, अशा परिस्थितीत महावितरण ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरी भागातील महसुलावर आपला गाडा चालवत आहे, मात्र चांगला आणि नियमित महसूल मिळणाऱ्या ठिकाणी समांतर वीज वितरण परवाना खासगी कंपन्यांना दिल्यास आर्थिकदृष्ट्या महावितरणचे वांदे होण्याची भीती वीज क्षेत्रात व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.