अंबरनाथला नागरिकांचे ठिय्या आंदोलन
पाण्यासाठी ठिय्या आंदोलन
अंबरनाथ, ता. २१ (बातमीदार) ः सध्या धरणे, जलाशये भरून वाहू लागली आहेत; मात्र तरीही शहरातील पाणी समस्या सुटलेली नाही. अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात भेडसावणाऱ्या पाणी समस्येवरून संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत संताप व्यक्त केला. पाणी समस्या सुटली नाही तर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. अंबरनाथच्या पश्चिमेकडील बुवापाडा भागात कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अशोक शाह यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. २१) रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते बबलू सिंह यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बदलापूरमधील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्राला होणाऱ्या विद्युत पुरवठ्यात गेल्या काही महिन्यांपासून व्यत्यय येत आहे. त्यामुळे पाण्याची योग्य पातळी राहत नाही, पावसाळ्यात पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टरमध्ये तांत्रिक कारणांमुळे बिघाड होत आहे. त्यामुळे भेंडीपाडा पंपहाउसमध्ये व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही. परिणामी, उपलब्ध पाण्याच्या प्रमाणानुसार पुरवठ्याचे नियोजन करावे लागत आहे. जलकुंभातील पाण्याच्या पातळीनुसार पाणीपुरवठा केला जातो. बुवापाडा परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी किशोर शेकोकारे यांनी दिल्याचे शहा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.