मुंबई
मुलुंड रेल्वे स्थानकाची पाहणी
मुलुंड (बातमीदार)ः रेल्वे स्थानकाची पाहणी करून स्थानकातील असुविधांवर काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी चिंता व्यक्त केली. प्रवाशांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. शेट्टी यांनी पे अँड पार्क सुविधा, पिण्याच्या पाण्याची कमतरता, डिजिटल तिकीट काउंटरची खराब स्थिती आणि स्थानकातील अस्वच्छतेकडे लक्ष वेधले. अर्धवट बांधकाम, प्रवेशद्वाराजवळील खोदकामामुळे प्रवाशांना चालताना अडचणी येत असून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या समस्या प्रशासनाने तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.