युगांतर एक्‍स स्टार्टअपच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता

युगांतर एक्‍स स्टार्टअपच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता

Published on

युगांतर एक्‍स स्टार्टअपच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता
माणगाव, ता. २३ (बातमीदार) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या इन्‍क्‍युबेशन सेंटरअंतर्गत सुरू झालेल्या युगांतर एक्‍स या स्टार्टअपने भारताच्या डिजिटल परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे व्रत हाती घेतले आहे. कुलगुरू कर्नल डॉ. कारभारी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. ए. पी. शेष (कुलसचिव), डॉ. संजय नलबलवार (संचालक) आणि डॉ. नवीन खंडारे (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांच्या सहकार्याने या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
संगमेश्वर वैजनाथ गुरुशेटे आणि सागर गोविंद शिंदे या दोन युवा अभियंत्यांनी स्थापन केलेल्या ‘युगांतर एक्‍स’चा उद्देश भारतातील शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, व्यावसायिक घटक आणि प्रशासकीय यंत्रणांना कमी खर्चात डिजिटल स्वरूपात सक्षम करणे हा आहे. त्यांच्या स्टार्टअपने ‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याची दिशा स्वीकारली आहे. या स्टार्टअपने आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन, डेटा अ‍ॅनालिटिक्स, क्लाउड कम्प्युटिंग आणि सायबर सुरक्षा या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय, शैक्षणिक, आरोग्य, कृषी व वित्तीय क्षेत्रासाठी अत्यावश्यक डिजिटल सोल्युशन्स विकसित केले आहेत. ई-गव्हर्नन्स पोर्टल्स, ईआरपी सिस्टीम्स, स्मार्ट एपीआय, अ‍ॅग्रीटेक, एडटेक आणि फिनटेक सोल्युशन्स हे यांचे मुख्य उत्पादनक्षेत्र आहे.
या उपक्रमाचा खास वैशिष्ट्य म्हणजे हे स्टार्टअप पूर्णपणे शासकीय निकषांचे पालन करीत तसेच विश्वासार्हता टिकवून विविध संस्थांना सेवा देत आहे. त्यामुळेच ‘युगांतर एक्‍स’ भारतातील उदयोन्मुख टेक्नॉलॉजिकल ट्रस्ट पार्टनर म्हणून ओळखले जात आहे. या वेळी सहसंस्थापक संगमेश्वर गुरुशेटे यांनी सांगितले, की ही केवळ स्टार्टअपची नव्हे, तर नवभारताच्या नवयुगाची सुरुवात आहे. प्रत्येक गाव आणि संस्थेला डिजिटल सक्षम बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तर, सागर शिंदे यांनी आम्ही फक्त कोड लिहीत नाही, तर आम्ही भारताचे भविष्य घडवत आहोत. व्हिजन २०४७ पर्यंत भारताला सर्वश्रेष्ठ डिजिटल राष्ट्र बनवणे हेच आमचे ध्येय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com