शहरातील चौका-चौकात वाहतूक कोंडी
शहरातील चौकाचौकात वाहतूक कोंडी
सहाय्यक पोलिस आयुक्तांना मनसेचे निवेदन
कल्याण, ता. २२ (बातमीदार) : शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी समस्या वाढत चालली आहे. सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत मुख्य चौक आणि रस्त्यांवर कोंडीमुळे गोंधळाची स्थिती असते. याकडे वाहतूक विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत मनसेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलिस आयुक्तांची भेट घेत तत्काळ उपाययोजना न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला.
सहजानंद चौकात सहा रस्ते एकत्र येत असूनही वाहतूक नियंत्रणाची कोणतीच ठोस उपाययोजना नाही. अवजड वाहनांना दिवसा बंदी करावी, रामदेव हॉटेलजवळ खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस मुख्य चौकात उभ्या राहतात, त्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. सीसीटीव्ही असूनही नियंत्रण यंत्रणा निष्क्रिय झाल्याचेही म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्थानक परिसरात गंभीर वाहतूक कोंडी असते. तसेच आग्रा रोडवरील दक्षिणमुखी मारुती मंदिर चौकात अपघात होऊनही वाहतूक नियंत्रक अनुपस्थित असतात, याकडेही निवेदनातून लक्ष वेधले आहे.
आंदोलनाचा इशारा
शहरात ठरावीक ठिकाणी रिक्षा थांबे उभारण्यात यावेत. शाळा, हॉस्पिटलबाहेर उभ्या असलेल्या वाहनांवर थेट दंड करण्याऐवजी समज देऊन सहकार्य करण्यात यावे. वाहतूक पोलिसांची संख्या आणि कार्यक्षमतेत वाढ करावी यासह अन्य मागण्या केल्या आहेत. तसेच कल्याण शहरातील वाहतूक समस्या लवकरच न सुटल्यास मनसे रस्त्यावर उतरेल आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.