अंबरनाथमध्ये सीएनजी पंपावर गॅसगळती

अंबरनाथमध्ये सीएनजी पंपावर गॅसगळती

Published on

अंबरनाथमध्ये सीएनजी पंपावर गॅसगळती
वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे अनर्थ टळला
अंबरनाथ, ता. २२ (वार्ताहर): शहरात सोमवारी (ता. २१) रात्री सीएनजी पंपावर गॅस भरताना अचानक गळती सुरू झाली. यावेळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते; मात्र सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून वेळीच गळतीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरील फॉरेस्ट नाक्याजवळील सीएनजी पंपावर घडली. सोमवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सीएनजी गॅस वाहून नेणाऱ्या ट्रकच्या सिलेंडरमध्ये गॅस भरताना अचानक नोझलमधून गॅस गळती सुरू झाली.

प्राथमिक माहितीनुसार, हा ट्रक इगतपुरी येथे गॅस पोहोचवण्यासाठी निघाला होता. गॅस गळतीची जाणीव होताच ट्रकचालकाने तात्काळ सूचना दिली. तत्काळ सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यांनी यंत्रणा बंद करून गळती थांबवली. त्यामुळे स्फोटासारख्या संभाव्य दुर्घटनेपासून परिसर बचावला. फॉरेस्ट नाका हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा चौक असून येथे दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या पंपावर दररोज शेकडो वाहनांमध्ये गॅस भरणं चालू असतं. अशा ठिकाणी गॅस गळती झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गॅस पंपावरील सुरक्षितता, यंत्रणांची तपासणी व आपत्कालीन उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com