नागावला पिण्याच्या पाण्याबाबत स्वंयपुर्ण बनविणार हर्षदाताई मयेकर यांच व्हिजन
नागावला पाण्यासाठी स्वयंपूर्ण बनवणार
हर्षदा मयेकर यांचे व्हिजन
(ॲड. हर्षल मोरे)
नागाव ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्यासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही. पुढील काळात शुद्ध पिण्याच्या पाण्याबाबत संपूर्ण ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झालेली असेल. गावातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबविणार असून गावातील तलावातील पाण्याचा उपयोग करून नागरिकांना शुद्ध पाणी पुरविणार आहे. यासाठी सरकारी स्तरावर कितीही पाठपुरावा करावा लागला तरी तो करणार असल्याचे हर्षदाताई मयेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आश्वासन दिले.
नागावचा अभिमान ः एक नेता, एक समाजसेवक
हर्षदा मयेकर या केवळ सरपंच नाहीत, तर गावाच्या हृदयाचे ठोके आहेत. लोकशाहीची मूल्य जपत, पारदर्शक प्रशासन आणि समाजहितासाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागावच्या लाखो शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. ते त्यांच्या कर्तृत्वामुळे. नेतृत्व हे अधिकारासाठी नसते, ते जबाबदारीसाठी असते आणि हर्षदा मयेकर हे त्याचं जिवंत उदाहरण आहे.
शब्द नाहीत, कामातून ओळख
‘जनतेचा विश्वास हीच माझी सत्ता’
‘मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर’ अशी देणगी स्त्रीला असते. सामर्थ्य, श्रद्धा, शील, सहनशीलता, सेवा, मातृत्व, हे गुण अंगी असणाऱ्या महिलांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविलेला आहे. त्यांना गरज असते ती स्वतःला ओळखण्याची. म्हणूनच महिलांना विविध मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करून त्यांच्यातील क्षमतेची जाणीव करून देण्यावर भर देण्याचा प्रयत्न करीत आहे. महिलांना सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याचा माझा मानस आहे आणि मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार.
आपण फार भाग्यवान आहोत, ज्यांना जिजाऊ, झाशीची राणी, डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले या आणि अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडला आहे. त्यांच्या विचाराने, अनुभवाने जीवनाला एक दिशा मिळते. या सगळ्या महान कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये एक सामायिक बाब होती ती म्हणजे चिकाटी, धैर्य आणि बंडखोर वृत्ती. यांचा आदर्श ठेवून प्रत्येक स्त्रीने आपल्यातील क्षमता ओळखली पाहिजे आणि पुढे आले पाहिजे. समाजाला उच्च कोटीवर घेऊन जायचे असेल, तर स्त्रियांना पुढे यावेच लागेल.
हर्षदा मयेकर या नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच किंवा राजकारणीच नाहीत, तर उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तळागाळातील लोकांसाठी शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, ग्रामविकास इत्यादी कार्यांसाठी त्या कार्यशील आहेत. त्यांनी या सगळ्या प्रवासात घराकडे दुर्लक्ष न करता पती व घरच्यांना भक्कम साथ देत स्वतःची एक आगळी वेगळी ओळखही निर्माण केली आहे. मनाला गर्वाची बाधा लागू नये यासाठी त्या श्रमदान करून आपल्या कर्तव्याची जाणीव ताजी करतात.
शून्य टक्के कचरा नियोजन
घनकचरा व्यवस्थापनासाठी शून्य कचरा योजना ग्रामपंचायतीमध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. सत्ता नसली तरी इच्छा असेल, तर निधी उपलब्ध करता येतो. विधान भवनमध्ये दर बुधवारी विविध खात्यांचे मंत्री नागरिकांना भेट देतात. तेव्हा तिथे जाऊन गावाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्याचा प्रयत्न असतो. गावातील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी विविध उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत. लोप पावत चाललेल्या मराठी शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. गावाच्या विकासासाठी विविध मार्गाने निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामपंचायतीकडून केल्या जाणाऱ्या करवसुलीचे आधुनिकीकरण केले.
महिलांना आर्थिक सक्षम करणार असून, शुद्ध पाणी प्रकल्प उभारणार आहे.
मनशांती ही पुरस्कारापेक्षा मोलाची
आयुष्य एक परीक्षा आहे, त्याची प्रश्नपत्रिका माहीत नाही, उत्तरपत्रिकेचे नमुने पण हाताशी नसताना काही नियम जर आपण स्वतःला घातले, तर आयुष्य सोपे होऊन जाते. हर्षदाताई पुढे म्हणतात, तुम्ही एकाच वेळी अनेकांना खूश ठेवण्याच्या प्रयत्नात एकालाही खूश ठेवू शकत नाही. आग कधी आगीने विझत नाही, त्याला पाण्याचीच गरज लागते. चांगले नातेसंबंध, मानसिक शांतता ही मोठमोठ्या पुरस्कारांपेक्षा फार मोलाची आहे. तुम्ही किती बुद्धिमान आहात किंवा तुम्ही किती धनवान आहात, हे महत्त्वाचे नसून तुम्हाला यशस्वी बनण्यासाठी ध्येयाचा ध्यास आणि चिकाटी तुम्हाला यश देईल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. तुम्ही यशस्वी नक्की व्हाल, असे त्या सांगतात.
हर्षदाताईंना स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि कर्तृत्वावर प्रचंड विश्वास आहे आणि म्हणूनच त्यांनी गाव कारभार सांभाळण्याचे कार्य हाती घेतले. आपल्याला आपले विचार व्यक्त करता आले पाहिजे. हर्षदाताईंच्या मते चांगल्या विचारांचे, गोष्टींचे मिळालेले स्वातंत्र्य ही आयुष्यातील सर्वात मोठी चैनेची वस्तू आहे.
राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार जाहीर
कठोर परिश्रम, समर्पण, आर्थिक नियोजन, नाती, योग्य करिअर निवडणं, मोठ्यांचं ऐकणं, नियमांचा आदर करणं, ध्येयं समोर ठेवणं, निरोगी जीवनशैली आत्मसात करणं, कृतज्ञतेच्या भावनेमध्ये राहणं, जगणं वगैरे वगैरे. या सर्व गोष्टींचं महत्त्व सांगितलं जातं. या सर्व गोष्टी चांगल्याच आहेत यात शंका नाही, परंतु वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर यश मिळवण्यासाठी भावनिक परिपक्वता हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. सर्व सजीवांमध्ये जागृतता असतेच, पण मानवाला त्याबरोबरच महान बुद्धिमत्तेची जोड मिळालेली आहे. सकारात्मक, नकारात्मक विचार आणि भावना यांचा सतत प्रवाह चालू असूनही माणूस सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.
सकारात्मक बदल करण्याच्या मानवाच्या या क्षमतेमुळेच तो इतरांपेक्षा वेगळा जाणला जातो आणि अशा विचारांमुळेच हर्षदाताई इतरांपेक्षा वेगळ्या आहेत, हे सिद्ध होतं आणि म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेत हर्षदाताईंना राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ अशी मराठीत एक अर्थपूर्ण म्हण आहे. पुढच्यांच्या अनुभवांकडे डोळसपणे बघितलं पाहिजे. त्याला आलेल्या अपयशातून आपण बोध घेतला पाहिजे. त्या चुका आपण टाळल्या पाहिजेत.
याच्याही पुढे जाऊन हर्षदाताई असं म्हणतात की, ‘‘यशस्वीपणे मार्गक्रमण करणाऱ्या लोकांच्या सवयी तुम्ही आत्मसात करा. ते वागतात कसे, बोलतात कसे, त्यांचा अडचणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, त्यातून ते मार्ग कसा काढतात, हे सगळं लक्षपूर्वक बघा. ते आत्मसात करा. तुमच्या मागून येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही आदर्श बनाल’’, असा सल्ला हर्षदाताई आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजच्या नवीन पिढीला या वेळी देतात.
मोबाईलवरील वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स, जाहिराती, ई-मेल्स, संदेश यामध्ये आपला बराचसा वेळ वाया जातो. अशा लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींना दूर ठेवून जास्तीत जास्त उत्पादनक्षम कसं राहावे यावर प्रत्येकाने भर दिला पाहिजे. आयुष्य सुखमय बनवायचे असेल, तर आधी गरज निश्चित करावी लागेल. टार्गेट निश्चित केलं की मग कार्यपद्धती ठरवावी लागेल. अर्थात काम कसे पूर्ण करायचे त्याचे नियोजन करावे लागेल. आपली गरज कोणती हे ओळखून त्यासाठी कार्यपद्धती कोणती वापरायची हे ठरवले की पुढील गोष्टी निश्चितच सोप्या जातात, असे हर्षदाताई सांगतात.
सेवेचा संकल्प, नेतृत्त्वाची प्रेरणा
वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर यश मिळवण्यासाठी भावनिक परिपक्वता हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. सर्व सजीवांमध्ये जागृतता असतेच, पण मानवाला त्याबरोबरच महान बुद्धिमत्तेची जोड मिळालेली आहे. सकारात्मक, नकारात्मक विचार आणि भावना यांचा सतत प्रवाह चालू असूनही माणूस सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. सकारात्मक बदल करण्याच्या मानवाच्या या क्षमतेमुळेच तो इतरांपेक्षा वेगळा जाणला जातो. काही लोकांना त्यांना काय पाहिजे आहे हे पक्कं ठाऊक असतं आणि ते त्या ध्येयाने वेडे होऊन जगत असतात, तर काही आपल्याकडील असलेली साधने, संसाधने, मनुष्यबळ याचा परिणामकारक वापर कसा करायचा हे न समजल्यामुळे बरेच लोक आपल्या व्यवसायात, कामात मागे पडतात, तर अनेकांना स्वतःच, स्वतःच्या वेळेचं, स्वतःच्या कार्यक्षमतेचं व्यवस्थापन न करता आल्यामुळे त्यांची शक्ती नको तिथे लागते आणि अपेक्षित परिणाम साधता येत नाही. यासाठीच गावात विविध स्तरावर आजपर्यंत २५० ते ३०० योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविल्या, असेही हर्षदाताई म्हणाल्या. त्यांनी हाती घेतलेल्या कामात त्यांना यश येते असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत सरपंच हर्षदाताई म्हणतात हा नागावकरांचा माझ्यावर विशेषतः माझ्या कामावर असलेला विश्वास आहे तसेच ते त्यांचे प्रेम आहे. प्रत्येकाला बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी असलेल्या हर्षदाताई सर्वांबरोबरच आपुलकीने बोलतात. वास्तविक राजकारणात सध्या दादा, भाई, शेठ, ताई, बाईसाहेब अशी अनेक प्रकारची बिरूदे लावून घेतली जातात, परंतु हर्षदा यांच्या बाबत वेगळेच आहे. त्याच सर्वांना काका-काकी, मामा-मामी, आजी-आजोबा, दादा-ताई, आप्पा, तात्या अशाप्रकारे बोलून समोरच्या व्यक्तीला मान देत असतात, यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो.
जिल्ह्याच्या राजकारणाबरोबरच राज्यातही त्यांच्या कामाची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी आणलेल्या विकासनिधीवरून समजते. तरीही कोणताही लवाजमा व थाट-माट न करता प्रत्येक सण-समारंभाला उपस्थित राहून गावातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपलंस करणाऱ्या हर्षदा मयेकर यांच राहणीमान व त्यांचा स्वभाव यातून दिसून येतो. त्या म्हणतात माझे जीवन विशेष आहे, कारण मला ते अशा अद्भुत लोकांसोबत शेअर करण्यात आनंद आहे. माझ्या वाढदिवशी, मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी माझे दिवस आणि रात्री इतके सुंदर बनवले. जे नेहमी मदत, समर्थन आणि पुढे जाण्यासाठी सामर्थ्य आणि शुभेच्छा देतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरपंच मॅडम, तुमचं नेतृत्त्व अखंड राहो आणि नागावची प्रगती तुमच्या मार्गदर्शनाखाली तेजस्वी होत जाओ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.