आग
रोडपालीत किराणा दुकानाला आग
लाखो रुपयांचे नुकसान
पनवेल, ता. २२ (बातमीदार) ः रोडपाली परिसरात सोमवारी (ता. २१) रात्री साडेअकराच्या सुमारास पाटील डेअरी या किराणा मालाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दुकान बंद झाल्यानंतर काही तासांतच आगीचे लोळ उठले. परिसरातील नागरिकांच्या अग्निशमन विभागाला कळवल्यावर पनवेल महापालिकेच्या अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीत दुकानातील किराणा माल, डेअरी उत्पादने, स्टोअरेज यंत्रणा आणि इतर साहित्य खाक झाले. या आगीत अंदाजे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
...
खारघरमध्ये चायनीजचे दुकान खाक
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : खारघर रेल्वेस्थानकासमोर सेक्टर-१ येथील शीव-पनवेल महामार्गालगत असलेल्या एका चायनीज दुकानाला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तासाभरात आग आटोक्यात आणली. दुकानात त्या वेळी कोणीही नसल्याने जीवितहानी टळली, मात्र दुकानातील संपूर्ण सामान खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास खारघर रेल्वेस्थानकासमोर सेक्टर-१ येथील शीव-पनवेल महामार्गालगत असलेल्या एका चायनीज दुकानाला अचानक आग लागली. याबाबतची माहिती मिळताच खारघर येथील सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुकानाचे शटर उघडून शोरमा मशीनमध्ये पेटलेला एलपीजी गॅस सिलिंडर बाहेर काढून आग विझवली. तसेच दुकानातील इतर वस्तूंना लागलेली आगही विझवण्यात आली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दुकानात असलेले दोन भरलेले आणि दोन रिकामे असे एकूण चार एलपीजी गॅस सिलिंडर सुरक्षितरित्या बाहेर काढले. खारघर अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी सौरभ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन प्रणेता प्रशांत दरेकर, यंत्रचालक आर. एल. बंडा, फायरमन संभाजी पाटील, गणेश भोईर, एन. जे. मढवी आणि बी. व्ही. भोसले यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.