उल्हासनगरात देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह
उल्हासनगर (बातमीदार) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमध्ये भाजपच्या वतीने मंगळवार (ता. २२)पासून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह सुरू झाला आहे. आठवडाभर रक्तदान शिबिर होणार असून नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी केले आहे. मंडळ क्रमांक-१ चार्ली चाळ, कमला नेहरूनगर, धोबीघाट, मंडळ क्रमांक-२ महेश सुखरमाणी यांच्या कार्यालयाजवळ, समाजमंदिर, मंडळ क्रमांक -३ (अ) खन्ना कम्पाऊंड, मंडळ क्रमांक -३(ब) पेट ऑक्सफर्ड स्कूल, ऑडिटोरियम, मंडळ क्रमांक ४ (अ) ईशरदास दरबार, ओटी विभाग, मंडळ क्रमांक -५ लाल साई मंदिर, छोटू डॉक्टरजवळ, मंडळ क्रमांक -६ प्रेसिअस मेडोज, सारिका लॉनसमोर, झेनो हेल्थजवळ, म्हारळ गाव या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.