आफ्रिकेतील किलिमांजारोवर फडकवला तिरंगा
आफ्रिकेतील किलिमांजारोवर फडकवला तिरंगा
डोंबिवलीच्या आर्यनची ऐतिहासिक कामगिरी
कल्याण, ता. २२ (बातमीदार) ः शहरातील एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय आर्यन अजित शिरवळकर याने आफ्रिकेच्या टांझानियामधील जगातील सर्वात उंच स्वतंत्र पर्वत माउंट किलिमांजारो (५,८९५ मीटर / १९,३४१ फूट) यशस्वीरित्या सर करत भारताचा तिरंगा सर्वोच्च शिखरावर फडकवला. ही अवघड मोहीम आर्यनने ६ ते १२ जुलैदरम्यान पूर्ण केली. अत्यल्प ऑक्सिजन, कमी वायुदाब, पाण्याची मर्यादा आणि खडतर चढाई, अशा अडचणींना तोंड देत आर्यनने हे यश मिळवले. मोहिमेनंतर त्याचे डोंबिवलीत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
वयाच्या १५व्या वर्षी गिर्यारोहण सुरू करणाऱ्या आर्यनने आतापर्यंत हिमालय, उत्तराखंड, हिमाचलमधील ५० हून अधिक पर्वत, तसेच महाराष्ट्रातील ५०० हून अधिक गड-किल्ले सर केले आहेत. त्याने अब्विमास संस्थेतून माउंटेनेअरिंग इन्स्ट्रक्टर कोर्स, हनिफल सेंटरमधून आउटडोअर लीडरशिप आणि विल्डरनेस फर्स्ट रिस्पॉन्डर प्रमाणपत्र मिळवले आहे.
आर्यनने विविध कंपन्यांमध्ये नेतृत्व विकास, प्राथमिक उपचार व निसर्ग संवर्धनावर प्रशिक्षण सत्र घेतले आहेत. त्याच्याकडे ४०० पेक्षा अधिक ट्रेक करण्याचा अनुभव आहे. माझं ध्येय म्हणजे लोकांना निसर्गाकडे घेऊन जाणं आणि त्यांच्यात संवेदनशीलता निर्माण करणं. गिर्यारोहण हेच माझं जीवन आहे. अशा भावना आर्यनने व्यक्त केल्या. या उत्कृष्ट कामगिरीसाठी आर्यनवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मनालीत प्रशिक्षण
मनाली येथून त्याने गिर्यारोहणाचे विशेष प्रशिक्षण घेतले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने १३,५०० फूट उंच पथल शु माउंटन सर केला होता, याशिवाय त्याने भारतातील हिमाचल, उत्तराखंड आणि अन्य राज्यांतील ५० हून अधिक पर्वत, गड-किल्ले, तसेच महाराष्ट्रातील ५०० हून अधिक गड-किल्ले सर केले आहेत. मागील सात वर्षांपासून आर्यन या क्षेत्रात कार्यरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.