मुंबई
अॅड.अवनीश सिंह यांचा सत्कार
मुलुंड (बातमीदार)ः मुंबई काँग्रेस उत्तर भारतीय प्रकोष्ठाचे नवनियुक्त अध्यक्ष अॅड. अवनीश तीर्थराज सिंह यांचा भव्य सत्कार सोहळा मुलुंड पश्चिम येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन अॅड. सिंह यांचा गौरव केला. उपस्थित मान्यवरांमध्ये बी. के. तिवारी, अब्राहम रॉय मणी, डॉ. बाबूलाल सिंह, डॉ. आर. आर. सिंह, प्रदुम्न यादव, तसेच समाजसेवक रमाशंकर तिवारी, अंजनी कुमार सिंह, संतोष विश्वकर्मा आदींचा समावेश होता. विशेष अतिथी म्हणून विविध उत्तर भारतीय समाज संस्थांचे पदाधिकारी हरीश वर्मा, राजाराम पाल, लक्ष्मीनारायण चौरसिया, रमेश जायसवाल आणि डॉ. सचिन सिंह उपस्थित होते. या वेळी लेखक, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.