भटक्या कुंत्र्यांच्या उपद्रवावर आता खासगी मार्ग
भटक्या कुंत्र्यांच्या उपद्रवावर आता खासगी मार्ग
ठाणे पालिकेचा मोठा निर्णय; निर्बीजीकरण आणि लसीकरणासाठी निर्णय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, कुत्रे पकडण्यासह, पशुधन पर्यवेक्षक आणि डॉक्टरांची पदेच रिक्त असल्यामुळे भटक्या कुत्र्यांना आळा घालण्याण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. याची दखल घेत, पालिकेच्या आरोग्य विभागाने आता भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण आणि उपचार हे खासगी संस्थेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
ठाणे शहरातील विविध भागात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांकडून बालकांसह वयोवृद्ध नागरिकांना लक्ष करीत आहेत. त्यात अपुऱ्या साहित्य सामग्री व मनुष्यबळामुळे अनेकदा अशा भटक्या कुत्र्यांना आळा बसविणे तारेवरची कसरत करावी लागत आहे. २०१८ पासून भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रियादेखील बंद आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जटिल झाला होता. याची दाखल घेत, तत्कालीन ठाणे महापलिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात श्वान नियंत्रण विभागाच्या सक्षमीकरणावरदेखील विशेष भर दिला आहे.
वागळे इस्टेट येथील निर्बीजीकरण केंद्राचे सक्षमीकरण करण्याबरोबर खासगी संस्थेच्या माध्यमातून निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले.
-----------------------------------------
कर्मचाऱ्यांची वानवा
ठाणे पालिकेच्या माध्यमातून २०१४ ते आतापर्यंत ७१ हजार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे, परंतु आजही शहरात ३० ते ३५ हजारांच्या आसपास भटके श्वानांचे निर्बीजीकरण करणे शिल्लक आहे. या कुत्र्यांचे निबीर्जीकरण व लसीकरण करण्यासाठी पालिकेचे एकमेव वागळे इस्टेट येथे केंद्र आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षात घेता, कुत्रे पकडण्यासाठी ३० ते ४० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना, सध्याच्या घडीला एकही कर्मचारी नसल्याचे दिसून येत आहे, तर डॉक्टरांची दोन्ही पदे रिक्त आहेत. नर्सेसची पाच ते सहा आणि सात पशुधन पर्यवेक्षकांची आवश्यकता असून, एकही पद भरलेले नाही.
------------------------------------
यंत्रणा अपुरी
दरम्यान, या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने वागळे इस्टेट येथील निर्बीजीकरणाचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. भटक्या कुत्र्यांसाठी ८० पिंजरे आणि वरील बाजूस असलेल्या जागेत मांजरीसाठी २५ पिंजरे बसविले जाणार आहेत. तसेच येथे खासगी संस्थेच्या माध्यमातून दोन डॉक्टरदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच पालिकेकडे उपलब्ध असलेली यंत्रणा अपुरी पडत असल्याने आता खासगी संस्थेच्या माध्यमातून भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि उपचारदेखील केले जाणार आहेत.
............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.