गटारीला मांसाहाराचा झणझणीत तडका
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : आषाढ महिन्याचा शेवट आणि गटारीनिमित्त नवी मुंबईत बुधवारी खवय्यांनी सकाळपासूनच चिकन-मटन, मच्छीविक्रेत्यांकडे गर्दी केली होती. शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. गुरुवारी अनेक जण मांसाहर करीत नाहीत. त्यामुळे अनेकांनी बुधवारीच गटारी साजरी केली. शहरातील तुर्भे, नेरूळ, जुईनगर आणि दिवाळे मच्छी बाजारात खरेदीसाठी गर्दी होती. मासळीच्या भावात २० ते २५ रुपये प्रतिकिलोने वाढ झाली होती.
आषाढ अमावास्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक कुटुंबांत मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे बुधवारी खवय्यांनी चिकन, मटणावर ताव मारला. गटारीच्या निमित्ताने घरगुती चिकन, मटण व तांदळाच्या भाकरींसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या. काही घरगुती व्यावसायिकांनी दोन दिवस आधीच ऑर्डर्स स्वीकारून चमचमीत जेवण तयार केले होते.
मासळीचे भाव प्रतिकिलो रुपयांत
सुरमई – १५००
पापलेट – १५००
हलवा – १०००
कोळंबी – ८००
रावत – १०००
फूड डिलिव्हरी अॅप्सला पसंती
घरबसल्या मांसाहारी पदार्थांची मागणी करणाऱ्यांसाठी फूड डिलिव्हरी अॅप्सचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होताना दिसला. अनेक अॅप्स ताजे चिकन, मटण आणि मासळी घरपोच देत असल्याने ग्राहकांनी ऑनलाइन ऑर्डरला पसंती दिली. त्यामुळे अशा कंपन्यांच्या उलाढालीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.
अडीच हजार किलो चिकनवाटप
गटारीनिमित्त नवी मुंबईतील नेरूळ आणि जुईनगर परिसरात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल ससाने यांच्या वतीने अडीच हजार किलो चिकनचे मोफत वाटप करण्यात आले. आधार कार्ड दाखवणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला एक किलो चिकन देण्यात आले. चिकन घेण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांग लावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.