स्वाक्षऱ्यांच्या खेळात शिक्षकांचे वेतन रखडले

स्वाक्षऱ्यांच्या खेळात शिक्षकांचे वेतन रखडले

Published on

स्वाक्षऱ्यांच्या खेळात शिक्षकांचे वेतन रखडले
अधिकाऱ्यांच्या नियुक्तीअभावी प्रक्रिया ठप्प
उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रशासकीय गोंधळाचा थेट फटका आता शहरातील शिक्षकांना बसू लागला आहे. शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांची नियुक्ती अद्याप न झाल्यामुळे, तसेच मुख्य लेखाधिकारी यांच्या अधिकृत स्वाक्षरी अद्ययावत नसल्यामुळे ११४ शिक्षकांचे जून महिन्याचे वेतन रखडले आहे. आता जुलै महिन्याचे वेतनही अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या महिन्यात शिक्षण मंडळातील प्रशासन अधिकारी आणि मुख्य लेखाधिकारी यांची बदली करण्यात आली. नवीन मुख्य लेखाधिकारी यांनी संघर्ष करून पदभार स्वीकारला असला तरी, त्यांची स्वाक्षरी अद्याप अधिकृत दस्तावेजांमध्ये अद्ययावत झालेली नाही. तसेच प्रशासन अधिकाऱ्यांची नियुक्ती अद्याप प्रलंबित असून, तात्पुरता प्रभारीही नेमण्यात आलेला नाही. या परिस्थितीमुळे वेतन मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होत नसल्याने संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली आहे. प्रशासकीय गोंधळाचा परिणाम शहरातील २१ शाळांमधील तब्बल ११४ शिक्षकांवर झाला आहे. वेतन अडकल्यामुळे अनेक शिक्षक घरखर्च, गृहकर्ज, शैक्षणिक गरजा आणि वैद्यकीय खर्च यामध्ये अडचणीत आले आहेत. शिक्षकांमध्ये यामुळे तीव्र अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे.

शिक्षण मंडळात प्रशासन अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत कामकाज पाहण्यासाठी असणारे ‘विस्तार अधिकारी’ हे महत्त्वाचे पदही अनेक वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे अशा संकटाच्या वेळी तातडीने निर्णय घेणारे कोणीही यंत्रणेत नाही. शिक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून तातडीने प्रशासकीय नियुक्त्या करण्याची मागणी केली आहे. शिक्षण क्षेत्रातील अस्थिरतेमुळे शाळांची कार्यक्षमता, विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम आणि इतर शैक्षणिक उपक्रमांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांच्या रिक्त पदामुळे वेतनाला विलंब झाला आहे. मात्र याबाबत उपसंचालक शिक्षण मंडळ यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच त्या पदावर योग्य अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर वेतन प्रक्रिया मार्गी लावली जाईल.
-मनीषा आव्हाळे आयुक्त, उल्हासनगर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com