ठाणे पालिकेतील टेंडर घोटाळा उघड!
ठाणे पालिकेतील टेंडर घोटाळा उघड!
सरकारच्या आदेशांना केराची टोपली; विशिष्ट ठेकेदारांना फायदा देण्यासाठी नियमांना हरताळ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे महानगरपालिकेत कामाच्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अपारदर्शकता आढळून आली असून, सरकारच्या स्पष्ट आदेशांना केराची टोपली दाखवत अधिकाऱ्यांनी टेंडर कालावधीत फेरफार केल्याचे उघड झाले आहे. विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी ही पद्धतशीर मोडतोड केल्याचा आरोप करण्यात येत असून, वर्तक नगर, वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर प्रभाग समित्यांचे अधिकारी या प्रकरणात अग्रस्थानी असल्याचा आरोपदेखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
राज्य शासनाने विविध विकासकामांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि दर्जेदार काम होण्यासाठी स्पष्ट अटी व शर्तींसह टेंडर प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक कामाच्या स्वरूपानुसार आणि अंदाजपत्रकाच्या मूल्याप्रमाणे टेंडर कालावधी निश्चित करण्यात येतो. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक कामांमध्ये अधिकारी मनमानीपणे टेंडरचा कालावधी बदलत असून, काही खास ठेकेदारांना अवाजवी फायदा मिळत आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे ठाणे महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिकेतील अधिकारी टेंडर प्रक्रियेत फेरफार करून, शासनाच्या आदेशांना दुजोरा न देता जनतेच्या पैशांचा दुरुपयोग केला जात आहे.
--------------------------------
नियोजित आर्थिक गैरव्यवहार
विशेष म्हणजे हे घोटाळे एखाद्या एकट्या विभागापुरते मर्यादित नसून विविध प्रभाग समित्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये हेच प्रकार सुरू असल्याचे माहितीमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे घोटाळे हा केवळ निष्काळजीपणा नसून एक नियोजित आर्थिक गैरव्यवहार असल्याचे आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला. तसेच ठाणे पालिका आयुक्तांना यासंदर्भात त्वरित चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
---------------------------
ठाणे पालिकेत मोठ्या प्रमाणावर टेंडर घोटाळा सुरू आहे. सरकारच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून, विशिष्ट ठेकेदारांना पोसण्यासाठी टेंडर कालावधीत फेरबदल करण्यात येत आहेत. संबंधित प्रभाग समित्यांचे अधिकारीदेखील या साखळीत सामील असून, त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे यंत्रणेत पारदर्शकता राहिलेली नसल्याचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.