उल्हासनगरमध्ये नारीशक्तीचा उत्सव
उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : सावनच्या सरी, हिरवळ नटलेली संध्याकाळ, पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिला, तालावर थिरकणारे पावले आणि निसर्गाच्या सान्निध्यात नारीशक्तीचा एक आगळा वेगळा सोहळा उल्हासनगरात पार पडला. उल्हासनगरमध्ये ‘हरियाली तीज २०२५’चा उत्सव हे दृश्य साकारत राजस्थानी महिला सेवा समितीच्या पुढाकाराने पार पडला. एक संस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरला.
उल्हासनगरच्या सेंच्युरी रेयान परिसरातील विश्राम भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात स्त्रीशक्तीच्या सौंदर्याला, आत्मविश्वासाला आणि सांस्कृतिक परंपरेला मानाचा मुजरा करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमात महिलांनी रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा, मन मोहवणारी मेहंदी, नृत्य, हास्यविनोद आणि खेळांद्वारे आपली कला, संस्कृती आणि उमंग यांचा जल्लोष केला. या सोहळ्यात शहरातील विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी महिला पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ती परमिंदर कौर भुल्लर, शिवसेना उपशहर संघटिका पूनम यादव, सोनी खैरे, विभाग संघटिका सविता कुंभार, उपविभाग संघटिकागीता शुक्ला या महिला पाहुण्यांच्या प्रेरणादायी वाटचालीने उपस्थित महिलांना नवसंजीवनी दिली.
कार्यक्रमासाठी राजस्थानी महिला सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. वंदना शर्मा (अध्यक्ष), सुनीता सैनी, संगीता शेखावत, सुनीता शर्मा, सपना धंड, हेमा शर्मा, लता सैनी, सुनीता वर्मा, रेखा शर्मा, अंशू शर्मा, रेखा सोनी, संगीता वर्मा आणि अमिता शर्मा या महिलांचा कार्यक्रम संयोजनात सक्रीय सहभाग होता. ‘हरियाली तीज’निमित्त पारंपरिक खेळ, सांस्कृतिक नृत्य आणि हास्य-मनोरंजनाचे सत्र रंगतदार ठरले. सहभागी महिलांनी सावनातील वातावरणात आपल्या कलागुणांना वाव दिला. आनंद, ऐक्य, सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा जपत महिलांनी एक वेगळाच उत्सव साजरा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.