नवी मुंबईतील बेकायदा धार्मिक स्थळांना दिलासा

नवी मुंबईतील बेकायदा धार्मिक स्थळांना दिलासा
Published on

नवी मुंबईतील बेकायदा धार्मिक स्थळांना दिलासा

नियमित करण्याच्या अनुषंगाने हालचालींना वेग
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : सिडको काळापासून नवी मुंबईतील विविध ठिकाणी बेकायदा उभारण्यात आलेल्या सर्व धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांना दिलासा मिळणार आहे. ही धार्मिक स्थळे नियमित करण्याबाबत राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशानत हा विषय लावून धरला होता. त्यानंतर आज मिसाळ यांच्या दालनात बैठक पार पडली.
नवी मुंबईत विविध संस्कृती आणि धर्माला मानणाऱ्या समाजाची धार्मिक स्थळे आहेत. या अनुषंगाने नवी मुंबईतील सर्व धर्मीय धार्मिक स्थळे नियमित करणे, स्थानिक प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करणे व इतर संबंधित विषयांवर माधुरी मिसाळ यांच्या मुंबई मंत्रालय येथील दालनात संबंधित अधिकाऱ्यासमवेत बैठक संपन्न झाली. नवी मुंबई शहरात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, जैन आदी धर्माचे लोक नवी मुंबई शहरात वास्तव्यास आहेत. नवी मुंबईमध्ये विविध जाती-धर्मांची प्रार्थना स्थळे आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका, सिडको, एम.आय.डी.सी, वन विभाग, वन विभाग (कांदळवन कक्ष, नवी मुंबई) मध्ये रेल्वे (नवी मुंबई क्षेत्र) या सर्व भूखंडावरती सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांनी धार्मिक स्थळे उभारली आहेत. ही मंदिरे फार पूर्वीपासून आहेत. ५ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार २९ सप्टेंबर २००९ च्या पूर्वीची नियमित करावयची अनधिकृत धार्मिक स्थळे ही ‘अ’ वर्गवारीत केली जाणार आहेत. त्याकरिता मंदिर संस्थेच्या वतीने स्वतंत्र अर्ज करून सचिव नगरविकास यांच्याकडे मंदिर नियमित करण्याकरिता प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे निर्देश माधुरी मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित व्हावे याकरितादेखील मंदा म्हात्रे यांनी सदर बैठकीदरम्यान प्रश्न उपस्थित केला. सदर प्रश्नांवर अधिकारी असीमकुमार गुप्ता यांनीदेखील सकारात्मकता दाखवत नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित होण्याकरिता मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड)देखील अतिमहत्त्वाचा असणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. याप्रसंगी असीम गुप्ता, सुशीला पवार-उपसचिव, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी, नवी मुंबई महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, आदी अधिकारी उपस्थित  होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com