लोकल साखळी बॉम्बस्फोट
आरोपी मोकाट, रेल्वे सुरक्षाही वाऱ्यावर

लोकल साखळी बॉम्बस्फोट आरोपी मोकाट, रेल्वे सुरक्षाही वाऱ्यावर

Published on

लोकल साखळी बॉम्बस्फोट आरोपी मोकाट
रेल्वेस्थानकांची सुरक्षा वाऱ्यावर
सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे सुस्तावल्याचे चित्र

मुंबई, ता. २३ : २००६च्या मुंंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मुंबईला हादरवणारे हे बॉम्बस्फोट लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात, सात रेल्वेस्थानकादरम्यान घडवून आणण्यात आले होते. यामध्ये १८९ जणांचा मृत्यू झाला तर ८००हून अधिक जण जखमी झाले. त्यानंतर २६/११च्या दहशतवादी हल्यानंतर मुंबईतील रेल्वेस्थानकांवरील ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यानंतर रेल्वेस्थानकांची सुरक्षाव्यवस्था भक्कम केली गेली. मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अतिरिक्त सुरक्षेसाठी होमगार्डची नेमणूक करण्यात आली; मात्र काही वर्षांनंतर ही सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे सुस्तावल्याचे चित्र आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने साखळी बॉम्बस्फोट झालेल्या सात रेल्वेस्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेचा घेतलेला हा आढावा...
....

१) वांद्रे
- पोलिस, सुरक्षा रक्षक, मेटल डिटेक्टर नाही.
- फलाट क्रमांक एकच्या सरकत्या जिन्याखाली काही जण झोपलेले पाहायला मिळाले. ते कुठून आले, याचा कुणालाच थांगपत्ता नाही.
- सुरक्षा रक्षकाचे बाकडे सुलभ शौचालयातील कर्मचारी वापरत असल्याचे चित्र आहे.
- वांद्रे रेल्वेस्थानकाला पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाला जोडून उभ्या असलेल्या झोपड्या अद्यापही तशाच आहेत.

२) खार
- खार रेल्वेस्थानकात कुठेही सुरक्षा रक्षक नाही.
- भिकारी, गर्दुल्ले यांचा वावर अधिक आहे.
- वांद्रे टर्मिनसला जोडणाऱ्या पादचारी पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सोय नाही.

३) बोरिवली स्थानक
- स्थानकाच्या सातही प्रवेशद्वारांवर कसलीही चौकशी नाही.
- मेटल डिटेक्टर नाही
- बॅग स्कॅनर बंद
- सुरक्षा रक्षकांची कमतरता

४) जोगेश्वरी स्थानक
- कोणतीही सुरक्षा तपासणी नाही.
- मेटल डिटेक्टर नाही.
- बॅग स्कॅनर मशीन नाही.
- स्थानकात भिकाऱ्यांचा वावर आहे.


५) मिरा-भाईंदर
- मेटल डिटेक्टर किंवा बॅग स्कॅनर नाही.
- प्रवेशद्वारावर तपासणी किंवा चौकशी होत नाही.
- रेल्वे पोलिस-आरपीएफ आहेत; मात्र सुरक्षा सजगता दिसून येत नाही.

६) माहीम
- फक्त एकाच फलाटावर दोन पोलिस दिसले.
- मेटल डिटेक्टर यंत्रणा नाही.
- प्रवेशद्वारावर सुरक्षेचा अभाव आहे.

७) माटुंगा रोड
- मेटल डिटेक्टर यंत्रणा नाही.
- फलाटावर असलेल्या पोलिस बाकांवर कुणीच नव्हते.
- कुठेही पोलिस बंदोबस्त नाही.


मुंबईतील इतर महत्त्वाची, वर्दळीची स्थानके
सीएसएमटी स्थानक
- स्थानकात अनेक ठिकाणी मेटल डिटेक्टर बंद तर बॅग स्कॅनर संख्या अपुरी
- बहुतेक कर्मचारी बाकांवर बसून मोबाइलमध्ये व्यस्त
- सीएसएमटी स्थानकावर असलेले अनेक प्रवेशद्वारे पूर्णपणे उघडी आहेत.
- कुठेही सुरक्षा चौकी किंवा सुरक्षा कर्मचारी तपासणी करताना दिसत नाहीत.


चर्चगेट स्थानक
- अनेक प्रवेशद्वारांवरील मेटल डिटेक्टर बंद
- पोलिस कर्मचारी (जीआरपी/आरपीएफ) एकत्र एकाच कोपऱ्यात बाकड्यावर बसून
- काही जवान मोबाइलमध्ये गुंतलेले किंवा गप्पा मारताना आढळले.
- संपूर्ण परिसरात सुरक्षा रक्षकांची अनुपस्थिती जाणवते.


दादर
- फलाट क्रमांक सहावर मेटल डिटेक्टर नाही.
- पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांक एकवर मेटल डिटेक्टर नाही.
- बॅग स्कॅनरही नाही.
- मध्य रेल्वे परिसरात दादर टर्मिनस येथे बॅग स्कॅनर बंद पडल्याने काढून टाकले.
- तिकीट खिडकी परिसरात मेटल डिटेक्टर बंद

कुर्ला
- प्रवेशद्वारावर ना मेटल डिटेक्टर, ना सुरक्षा कर्मचारी
- तिकीट खिडकीसह फलाटावर ठिकठिकाणी बनवलेल्या बंकरमधील सुरक्षा रक्षकही गायब
- नेहरूनगर आणि कसाईवाडा अशा दोन प्रवेश मार्गिकेवर तपासणीची व्यवस्था नाही.


मुंबई सेंट्रल स्थानक
- देशभरातून येणाऱ्या प्रवाशांची व पार्सलची मोठी वर्दळ
- प्रवेशद्वारांवर कोणतीही तपासणी नाही.
- मेटल डिटेक्टर अपुरे, जिथे आहेत तिथेही तपासणी नाही.

घाटकोपर
- एकाही प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त नाही.
- मेटल डिटेक्टर नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com