पालघरच्या रेल्वे विकासासाठी ठोस पावले
पालघर, ता. २३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याच्या रेल्वेसेवेत सुधारणा व्हावी, यासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन सादर करून विविध मागण्या मांडल्या.
पालघर स्थानकावर १२९३५/३६ वांद्रे-सुरत इंटरसिटी, २०९४१/४२ वांद्रे-गाझीपूर एक्स्प्रेस या गाड्यांचा थांबा द्यावा, २२९०१/०२ वांद्रे-उदयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसचे नाव ‘महाराणा प्रताप एक्स्प्रेस’ असे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ऑगस्ट क्रांती राजधानी, अवंतीका, जोधपूर-पुणे, दादर-अजमेर, वांद्रे-भावनगर, दौंड-इंदूर एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघरमध्ये थांबा द्यावा, अशी विनंती केली आहे.
बोईसर, वसई स्थानकांवरील मेमूसेवा विस्तार, उंबरगावला फ्लाइंग राणी एक्स्प्रेसचा थांबा, तसेच नवापूरपर्यंत मेमू वाढवावी, अशा मागण्या आहेत. ही केवळ सुरुवात असून, उर्वरित मागण्या मान्य होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणार, असे खासदार सवरा यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.