गर्भवतीला रुग्णालयात झोळीतून नेण्याची वेळ

गर्भवतीला रुग्णालयात झोळीतून नेण्याची वेळ

Published on

गर्भवतीला रुग्णालयात झोळीतून नेण्याची वेळ
महिनाभरातील तिसरी घटना

शहापूर, ता. २३ (वार्ताहर) : डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या शहापूर तालुक्यातील भवरपाडा येथील गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यासाठी रस्त्याअभावी झोळीतून तब्बल एक किमी प्रवास करावा लागला. तालुक्यातील महिनाभरातील ही अशी तिसरी घटना आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने पुढे या महिलेला रुग्णवाहिकेऐवजी खासगी गाडीतून शहापूर उपजिल्हा रुग्णालय गाठावे लागले. संबंधित महिलेची प्रसूती झाली असून, प्रकृती स्थिर आहे.
नडगाव (सो.) ग्रामपंचायतीमधील चाफेवाडी, फुगाळे ग्रामपंचायतीमधील वरसवाडी येथील महिला रुग्णांना रस्त्यांअभावी झोळीतून प्रवास करावा लागल्याच्या घटना गेल्या महिनाभरात घडल्या असतानाच, आता वांद्रे ग्रामपंचायतीमधील डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या भवरपाडा येथील मनीषा भवर (वय ३३) या गर्भवती महिलेला मंगळवारी (ता. २२) दुपारी प्रसूतिकळा येऊ लागल्याने कुटुंबीयांची मोठी धावपळ उडाली. एकीकडे धो-धो कोसळणारा पाऊस, दुसरीकडे मोबाईल नेटवर्कअभावी रुग्णवाहिकेशी संपर्क होणे अशक्य झाले. त्यातच भवरपाडा येथून मुख्य रस्त्यापर्यंत एक किमी अंतर रस्ताच नसल्याने मनीषा यांना झोळीतून शेताच्या बांधावरून चिखलाच्या पायवाटेने प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. दरम्यान, मनीषा यांची प्रसूती झाली असून, प्रकृती स्थिर असल्याचे उपजिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले.
...
पाड्यावर रस्त्याचा अभाव!
वांद्रे ग्रामपंचायत अंतर्गत डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या भवरपाडा, दोडकेपाडा व आलनपाडा येथे वनजमिनीच्या अडसरामुळे या पाड्यांवर जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे तेथील सरपंच मारुती साठे यांनी सांगितले. गेल्या तीन-चार वर्षांपासून रस्त्याला अडचण ठरणाऱ्या वनजमिनीचा आवश्यक प्रस्ताव सादर करूनही त्याला मंजुरी मिळाली नसल्याने पूर्णतः आदिवासी लोकसंख्या असलेल्या या पाड्यांवरील ग्रामस्थ महिलांना पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागत असून, या गंभीर समस्येतून कधी सुटका होणार, असा प्रश्न येथील आदिवासींना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com