जलसिंचनाची क्षमता ३० टक्क्यांनी वाढणार आयआयटी मुंबईतील संशोधकांचे नवे संशोधन
जलसिंचन क्षमता ३० टक्क्यांनी वाढणार
आयआयटी मुंबईतील संशोधकांचे नवे संशोधन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः देशातील दुष्काळप्रवण भागांमध्ये नगदी पिके घेण्यासाठी जलसिंचनाचे १० ते ३० टक्के पाणी वाचविण्याची क्षमता निर्माण करणाऱ्या संगणकीय सल्लागार मॉडेल आयआयटी मुंबईतील संशोधकांनी विकसित केले आहे. त्याद्वारे हवामान अंदाज, उपग्रहाद्वारे मातीतील आर्द्रता तसेच अन्य माहिती एकत्र करून ती संगणकीय प्रतिमानांच्या आधारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आयआयटी मुंबईच्या स्थापत्य विभागातील संशोधकांसह हवामान संशोधन केंद्र आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र विभागाने हे मॉडेल विकसित केले आहे. हे संगणकीय सल्लागार मॉडेल पिकांची गरज ओळखून पाण्याचे अचूक नियोजन करतो. हवामान अंदाज, मृदविषयक माहिती आणि सिंचनाची गरज यांचा एकत्रित विचार करून माहिती देतो. नाशिक आणि पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यात करण्यात आलेल्या प्रयोगांतून १० ते ३० टक्के पाण्याची बचत झाली आहे. या नव्या संशोधन पद्धतीमुळे देशातील दुष्काळग्रस्त अथवा दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी आणि पैशांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येईल. या प्रणालीमध्ये हवामानाचा एक ते तीन आठवड्यांचा अंदाज, उपग्रहाद्वारे मिळालेली मृदा आर्द्रतेची माहिती आणि शेतातील स्थानिक अभ्यासाचा समावेश करण्यात आला आहे.
----
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना या प्रणालीचा मोठा फायदा होईल. पिकांच्या आवश्यकतेनुसार सिंचन नेमके कधी करावे, शिवाय पाऊस पडणार असल्यास सिंचन न करण्याचाही सल्ला ही प्रणाली देईल. त्यामुळे पाण्याची आणि पैशांची बचत होईल.
- प्रा. सुबिमल घोष, संशोधक, आयआयटी मुंबई
----
विविध पिकांवर अभ्यास
जलसिंचनाची क्षमता वाढविण्याची ही पद्धत पश्चिम बंगालच्या बांकुरा येथे राबवण्यात आली. मका, गहू, सूर्यफूल, भुईमूग आणि ऊस या पिकांवर अभ्यास झाला. जमिनीचा पोत, मुळांची खोली, जलधारण क्षमता आणि पर्णरंध्रा क्रिया यांचा विचार करून तंत्र विकसित करण्यात आल्याचे घोष यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.