वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शुल्कांसाठी एफआरएची माघार
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या
शुल्कांसाठी ‘एफआरए’ची माघार
कोट्यातील प्रवेशासाठी पूर्वीचीच पद्धत अवलंबण्याची मुभा
मुंबई, ता. २३ ः राज्यातील विविध खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमडी, एमएस आणि एमडीएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या व्यवस्थापन कोट्याच्या जागांसाठी कमाल मर्यादा नियमित शुल्काच्या चारपटीवरून तीनपट कमी करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) मागे घेतला आहे. या निर्णयामुळे पूर्वीप्रमाणे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना चारपट शुल्क आकारण्याची मुभा मिळणार आहे. या निर्णयानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी २०१८ पासून प्रचलित असलेले शुल्कविषयक नियम पुन्हा लागू होणार आहेत.
‘एफआरए’ने एप्रिल महिन्यात वैद्यकीय शुल्क रचनेत बदल केला होता. त्यातून अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि फार्मसीसह सर्व तांत्रिक, उच्च आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी एनआरआय आणि व्यवस्थापन कोट्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार होते. त्यामुळे सर्व व्यावसायिक महाविद्यालयांना व्यवस्थापन कोट्याच्या उमेदवारांकडून नियमित शुल्काच्या तिप्पट शुल्क घेण्याची परवानगी देण्यात आली, तर एनआरआय उमेदवारांना कमाल पाचपट शुल्क भरावे लागणार होते. याच पार्श्वभूमीवर मागील सात वर्षांपासून, राज्यातील केवळ आरोग्य विज्ञान संस्थांमध्ये शुल्काची वेगळी नोंद केली जात होती.
----
वैद्यकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा
१. ‘एफआरए’ने सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी समान शुल्क नियम लागू करण्याचा निर्णय घेतल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी उच्च शुल्क मर्यादा पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या बरोबरीने आणली गेली होती. त्यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नाराजी पसरली होती.
२. राज्यातील अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अँड डेंटल कॉलेजेस असोसिएशनने (एएमयुपीएमडीसी) व्यवस्थापन कोट्याच्या पदव्युत्तर जागांसाठी कमाल शुल्कामध्ये कपात करण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘एफआरए’ने संबंधित निर्णयच मागे घेतल्याने वैद्यकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.