पट्टा
वृक्ष लागवडीसाठी पालिकेचे आवाहन
उल्हासनगर (बातमीदार) : राज्य सरकारच्या ११ कोटी देशी प्रजाती वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत, उल्हासनगर महापालिकेने शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी रोपे देण्याचे आवाहन केले आहे. उद्यान विभागप्रमुख विशाखा सावंत यांनी नागरिक, शासकीय-अशासकीय संस्था, माजी नगरसेवक, शाळा, एनजीओ, सार्वजनिक मंडळ इत्यादींनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शहराचे पर्यावरण राखण्यासाठी वृक्षारोपण ही सामाजिक बांधिलकी मानून इच्छुकांनी रोपे लावून त्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागास द्यावी. तसेच जे संस्था किंवा व्यक्ती स्वतः रोपे पुरवू इच्छितात त्यांनी ३१ जुलैपर्यंत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी स्वप्नील महाकाळे ८८०५९०१४८२ यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
बदलापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नीतू नायर
बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीच्या २०२५–२६ या वर्षासाठी नवी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. नीतू नायर यांची अध्यक्ष व डॉ. रमेश कुर्ले यांची सचिवपदी निवड करण्यात आली. पाटील बँक्वेट, मांजर्ली येथे पार पडलेल्या या पदग्रहण सोहळ्याला रोटरी जिल्हा प्रांतपाल हर्ष मकोल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष डॉ. बिपिनकुमार दुबे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नायर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी हर्ष मकोल यांनी ‘मोतीबिंदू मुक्त बदलापूर’ मोहिमेची माहिती देत यंदाही डॉ. प्रदीप कोळी यांच्या माध्यमातून मोफत ऑपरेशन्स राबवले जाणार असल्याचे स्पष्ट केले. या सोहळ्याला रोटरी जिल्हा ३१४२ मधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात क्रिकेटपटू रोहन राजे व टेबल टेनिस खेळाडू श्रुती अमृते यांचा गौरव करण्यात आला. बिपिनकुमार यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १०२ प्रकल्प राबवले. नीतू नायर यांनी समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश म्हसकर व डॉ. प्रियांका डूडेजा यांनी केले तर आभार ॲड. तुषार साटपे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.