विकासासाठी आर्थिक बळ

विकासासाठी आर्थिक बळ

Published on

पनवेल, ता. २४ (बातमीदार)ः महापालिकेने आर्थिक उत्पन्नवाढीसाठी नव्या मिळकतींच्या नोंदणीवर भर दिला आहे. गेल्या वर्षी तब्बल पाच हजार १५४ नवीन मालमत्ता पालिकेच्या कर प्रणालीमध्ये नोंदवल्या गेल्याने पालिकेला पाच कोटी २८ लाख २८ हजार ५५६ एवढा महसूल मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठीचे आर्थिक बळ पनवेल पालिकेला मिळणार आहे.
पनवेल महापालिकेने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. विविध विकास कामांमध्ये प्रस्तावित कामांमध्ये नवीन मुख्यालय बांधणे, मच्छी मार्केट, बहुमजली वाहनतळ, शाळा ,दैनिक बाजार, प्रभाग कार्यालये ‘हिरकणी’ हे माता व बाल संगोपन रुग्णालय-सर्व समावेशक ४५० बेडचे रुग्णालय उभारत आहे. या प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे पनवेल पालिका क्षेत्रात नवीन मिळकती नोंदवण्याची कार्यवाही सुरू आहे. या माध्यमातून पालिकेच्या उत्पन्नवाढीचे लक्ष्य आहे.
-------------------------------------
तळोजा, खारघर आघाडीवर
पनवेलमध्ये सर्वात जास्त नवीन मिळकतीची नोंद झाली असून, त्यापाठोपाठ तळोजा, खारघर यांचा नंबर लागतो. सध्या पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प, व्यापारी संकुले आणि औद्योगिक बांधकामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने डिजिटल सर्व्हे, ड्रोन मॅपिंग आणि घरगुती सर्वेक्षण सुरू केले आहे. महापालिका क्षेत्रातील वाढत्या शहरीकरणामुळे मिळकतींची संख्या सातत्याने वाढत असून, नव्याने समाविष्ट झालेल्या मालमत्तांमधून कोट्यवधी रुपयांचा कर जमा होणार आहे.
------------------------------------
कर आकारणीतील अडचणी
- कर आकारणीपासून दूर असलेल्या मिळकती.
- बांधकाम पूर्ण करूनही भोगवटापत्र घेतात, मात्र कर आकारणी टाळतात.
़़़़़़़़़- अनधिकृत बांधकामांना तीनपट कर आकारणी करून पैसे भरण्यास टाळाटाळ.
पूर्णत्वाचा दाखला घेणाऱ्या बिल्डरांकडून करभरणा केला जात नाही.
़़़़ः---------------------------------
नवीन वाढलेल्या मालमत्ता
ठिकाण मालमत्ता संख्या करातील वाढ
खारघर ९६४ १,२२,४२,३७२
कळंबोली २२१ १६,९७,९३९
कामोठे २१५ ९,५१,५७५
नवीन पनवेल पूर्व २८४ २९,१२,७७४
नवीन पनवेल काळुंद्रे ४१ १,२५,४३९
नवीन पनवेल पश्चिम २४३ १६,४४,८९२
पनवेल १४४७ २०,४३,६,२६७
तळोजा औद्योगिक क्षेत्र ५ २१,७,८५५
तळोजा पंचांनंद १,६८९ १२,००७,०९९
टेंभोडे वळवली ४५ ५,२८,२८,५५६
------------------------------------------
कोट बाकी
-स्वरूप खारगे, उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com