पुगांव-गारभट मार्गावर झाडाझुडपांची अतिक्रमण
पुगांव-गारभट मार्गावर झाडाझुडपांचे अतिक्रमण; प्रवाशांच्या सुरक्षेला धोका
रोहा, ता. २४ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावरील पुगांव नम्रता ढाबा ते गारभट गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे व झुडपांचे अतिक्रमण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. झाडांची प्रचंड वाढ झाल्यामुळे वाहनचालक संभ्रमात पडत आहेत. परिणामी, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुगांव, मढाली, डोळवहाल, ऐनवहाल, रेवेचीवाडी, गारभट, विठ्ठलवाडी, राजखलाटी, बल्हे, कांदला ही अनेक गाव या मार्गावर आहेत. शालेय विद्यार्थी, बाजारात ये-जा करणारे नागरिक, दूधविक्रेते, तसेच धाटाव एमआयडीसीत काम करणारे कामगार या मार्गाचा नियमित वापर करतात. त्यामुळे अनेक गावांचा दळणवळणाचा मुख्य मार्ग म्हणून या रस्त्याकडे पाहिजे जाते, परंतु झाडाझुडपांनी संपूर्ण मार्ग वेढला असून, त्याला वाकडी वळणे आणि आजूबाजूला घनदाट जंगल असल्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका सतत निर्माण होत आहे. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे झाडाझुडपांची छाटणी करून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली आहे.
................
पर्यटकांचीही वाढलेली गर्दी :
सध्या पावसाळा सुरू असल्याने या मार्गावर असलेल्या धबधब्यांकडे मौजमजेसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. या मार्गाची माहिती नसलेल्या नवीन पर्यटकांना रस्त्याची कल्पना न आल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
...............
कोट :
हा रस्ता पुगांव नम्रता ढाबा ते गारभट-दिघेवाडी मार्गे सुधागड-पालीकडे जातो. या मार्गावरून अनेक प्रवासी ये-जा करतात, मात्र वाढलेल्या झाडाझुडपांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी वाहनचालकांची तारांबळ उडते. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने झाडेझुडपे तोडून रस्ता मोकळा करावा.
- सुरेश धामणसे, सामाजिक कार्यकर्ते, डोळवहाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.