आरडीसीएतर्फे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंची नोंदणी;

आरडीसीएतर्फे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंची नोंदणी;

Published on

आरडीसीएतर्फे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंची नोंदणी
कायमस्वरूपी ओळखपत्र मिळणार
पोयनाड, ता. २४ (बातमीदार) : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे जिल्ह्यातील सर्व वयोगटांतील व खुल्या गटातील क्रिकेटपटूंसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नोंदणीकृत खेळाडूंना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्यात येणार आहे.
या ओळखपत्रामध्ये खेळाडूचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख आणि नोंदणी क्रमांक नमूद करण्यात येणार आहे. नोंदणी करणे सर्व खेळाडूंना अनिवार्य असून, नोंदणी केलेल्यांनाच रायगड जिल्‍हा क्रिकेट असोसिएशन व मान्यताप्राप्त क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.
.................
ऑनलाइन नोंदणीसाठी लिंक :
https://forms.gle/mDbk९okvBPsKq६yy५ नोंदणीसाठी खेळाडूंनी वरील लिंकवर जाऊन गुगल फॉर्म भरावा व नोंदणी शुल्क ऑनलाइन पद्धतीने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत जमा करावे. संपूर्ण माहिती संगणकीकृत करून तपासणी व पडताळणी केल्यानंतरच ओळखपत्र तयार करण्यात येईल. कोणत्याही खेळाडूने फॉर्ममध्ये चुकीची माहिती किंवा खोटे कागदपत्र सादर केल्यास त्याच्यावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात येईल, असा इशारा आरडीसीएने दिला आहे. जिल्ह्यातील सर्व क्रिकेट क्लब, अकॅडमी व संघांचे प्रतिनिधी यांच्यासाठी विशेष संवाद शिबिराचे आयोजन करून नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. अध्यक्ष अनिरुद्ध पाटील आणि सचिव प्रदीप नाईक यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व इच्छुक क्रिकेटपटूंना लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

नोंदणीसाठी संपर्क :
नाव संपर्क क्रमांक
जयंत नाईक (सहसचिव) ९५६१०९९७३५
ॲड. पंकज पंडित ८१४९२५२८२९
शंकर दळवी ९४२२५९४१४१
महेंद्र भातेकरे ९३२०५४१३५०
विनय पाटील ९०८२५८२९०५
सागर मुळे ९८१९४९४१७३
नरेंद्र मयेकर ९९६९३१३१६२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com