पारंपरिक राख्यांसह लाबुबु आणि फोटो  राख्यांची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ

पारंपरिक राख्यांसह लाबुबु आणि फोटो राख्यांची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ

Published on

बाजारात लाबुबू आणि फोटो राख्यांची धमाल
पारंपरिक राख्यांना आधुनिक स्पर्श ः लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भुरळ

डोंबिवली, ता. २४ (बातमीदार) : रक्षाबंधन जवळ येताच बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी फुलून गेल्या आहेत. पारंपरिक रेशमी धाग्यांपासून ते फॅन्सी कार्टून राख्यांपर्यंत विविध प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. यंदा सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे लाबुबू आणि फोटो राखी. मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच या राख्यांनी अक्षरशः भुरळ घातली आहे.
पारंपरिक राख्यांमध्ये हिंदू संस्कृतीशी निगडित गणपती, कृष्ण, ओम, स्वस्तिक यांसारख्या प्रतीकांची छटा असते. त्यात सजावट, चमकदार धागे आणि रंगीबेरंगी दागिने असलेली राखी मोठ्यांना विशेष प्रिय असते. परंतु सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली लहानशी कार्टून लाबुबू आता रक्षाबंधनाच्या सजावटीतही सामील झाली आहे. लाबुबूबरोबरच बहीण भावाचा फोटो असलेली राखी खूप ट्रेंड होत आहे.
कल्याणमधील सखी महिला बचत गटच्या प्रमुख सुनंदा कांबळे म्हणाल्या, ‘‘गेल्या वर्षी आम्ही कार्टून राख्या बनवल्या होत्या. यंदा लाबुबूला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकाच दिवशी ५०० ऑर्डर मिळाल्या आहेत.’’

पारंपरिक राख्यांचा मान कायम
लाबुबू राख्यांबरोबरच पारंपरिक राख्यांनाही बाजारात उत्तम प्रतिसाद आहे. काही लोक अजूनही हळदी-कुंकवाने सजवलेली, मातीच्या किंवा रेशमी दोऱ्यांची पारंपरिक राखी प्राधान्याने खरेदी करीत आहेत. विशेषतः मोठ्या भावंडांना अजूनही पारंपरिक राख्यांमध्येच अधिक आपलेपण वाटते.

फोटो राख्या ट्रेंडमध्ये
फोटो राखीमध्ये भावंडांचा एकत्र फोटो असतो. लहानपणीचा फोटो, एखादा आठवणीचा क्षण किंवा सध्याचा सुंदर फोटो. प्लास्टिक, अक्रेलिक फ्रेममध्ये फोटो लावले जातात आणि त्याला पारंपरिक राखीचाच मान दिला जातो.

ऑनलाइन विक्रीतही लाबुबूची आघाडी
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही लाबुबू राख्यांना जबरदस्त मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध साइट्सवर टॉप ट्रेंडिंग प्रॉडक्ट म्हणून दिसत आहेत. विविध रंगांमध्ये, लहान-मोठ्या आकारांमध्ये, साउंड इफेक्ट्स किंवा लायटिंगसह लाबुबू राख्या उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com