रस्ता बाधितांचे पुनर्वसन होणार...
रस्ता बाधितांचे पुनर्वसन होणार
अतिरिक्त आयुक्तंच्या आश्वासनानंतर रिपब्लिकन सेनेचे उपोषण मागे
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे विस्तारीकरण, दर्जेदार स्मारक बांधून देणे, गोविंदवाडी बायपासमधील नागरिकांचे पुनर्वसन करणे यांसह बाकीच्या मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून रिपब्लिकन सेनेच्या वतीने आमरण उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी उपोषण कर्त्यांसोबत चर्चा केली. रिपब्लिकन सेनेच्या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तानी दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांचे विविध मागण्यांसाठी तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. कल्याण शहर अध्यक्ष दामू काऊतकर, उपाध्यक्ष सुंदर काऊतकर यांनी सहभाग घेतला. या प्रमुख मागणीमध्ये कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्टेशनजवळील उद्यानाचे विस्तारीकरण व दर्जेदार स्मारक बांधून देण्याचा आराखडा लवकरात लवकर जाहीर करणे, गोविंदवाडी बायपासमधील रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आलेल्या गोरगरीब १२० कुटुंबांचे पुनर्वसन करणे, रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्णाची गैरसोय, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, जेनरिक मेडिकलची असुविधा, अशा विविध मागण्या बैठकीत मांडण्यात आल्या.
या उपोषणाच्या तीन दिवसांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दखल घेत रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळांना चर्चेला बोलवले. सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याशी जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांनी चर्चा घडवून आणली. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी या मागण्यांची सूचना व त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.