बदललेल्या जीवनशैलीमुळे आयव्हीएफची वाढती गरज, सरकारी रुग्णालयांमुळे वंधत्व जोडप्यांना दिलासा
(२५ जुलै - जागतिक आयव्हीएफदिन)
बदलत्या जीवनशैलीमुळे वंधत्वात वाढ
मुंबईतील दोन रुग्णालये आयव्हीएफ परवान्याच्या प्रतीक्षेत
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः बदललेल्या जीवनशैलीमुळे महिलांना नैसर्गिकरीत्या गर्भधारणा सहज शक्य होत नसल्याचे प्रमाण वाढले आहे. यातून आयव्हीएफची गरज वाढली आहे. अशा जोडप्यांना मातृत्वाचा आनंद मिळावा, यासाठी राज्य सरकारच्या कामा आणि पालिकेच्या सायन रुग्णालयात गर्भधारणेसाठी लागणाऱ्या (आययूआय) इंट्रा युटरिन इन्सेमिनेशन प्रक्रियेची सुविधा दिली जाते. वंधत्वावर उपचारांसाठी खासगी रुग्णालयात सरासरी चार ते सहा लाख रुपयांचा खर्च येतो; मात्र हीच सुविधा सरकारी रुग्णालयात अत्यंत कमी दरात उपलब्ध होणार आहे; मात्र मुंबईतील ही रुग्णालये अजूनही आयव्हीएफ परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत.
तिशीतच समस्या
तज्ज्ञांच्या संशोधनानुसार, भारतीय महिलांच्या गर्भाशयाचे वय युरोपियन महिलांच्या तुलनेत सहा वर्षे आधीच होते. यासाठी, प्रजनन आरोग्याची तपासणी हादेखील नियमित आरोग्य तपासणीचाच एक भाग असावा. कमी झालेला स्त्रीबीज साठा ही एक अशी स्थिती आहे, जिथे स्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने कमी होते. ही समस्या पूर्वी पस्तिशीत होती.
गर्भधारणा न होण्याची सामान्य कारणे
- कामाचा ताण
- पुरुषांची बैठी जीवनशैली
- शुक्राणूंचा दर्जा खालावणे
- महिलांना संसर्गाचा धोका
- नळ्या ब्लॉक असणे (पेटंट फॅलोपियन ट्युब )
- दारू, सिगारेट, तंबाखू, गुटख्याचे व्यसन
- व्यायाम करताना होणारा स्टेरॉईड्सचा वापर
- किशोरवयात महिलांमध्ये टीबीचा संसर्ग होणे
- आंतरप्रजनन संस्थेचे नुकसान होणे
इतर अडथळे- गर्भाशयात अतिरिक्त पडदा असणे, दोन गर्भपिशवी असणे, स्त्रीबीज कमी होणे, पीसीओडी, थायरॉईड वाढणे किंवा कमी होणे
ग्राफीक्स
- मुंबईतील कामा व सायन रुग्णालयात (आयूआय) सुविधा
- १५० हून अधिक महिला आयव्हीएफच्या प्रतीक्षेत
- दोन्ही रुग्णालये आयव्हीएफच्या परवान्याच्या प्रतीक्षेत
कामा रुग्णालय
एकूण ओपीडी - २,९८१
नवीन नोंदणीकृत रुग्ण - ७५८
फॉलोअप रुग्ण - २,२२३
एकूण पॉझिटिव्ह - १८
आयव्हीएफसाठी नोंद - ७८
खासगी रुग्णालयातील उपचार महागडे
खासगी क्लिनिक खर्च
महिन्याला तीन वेळा प्रक्रिया ४.५ लाख रुपये
आयव्हीएफची एक प्रक्रिया १.५ लाख रुपये
सरकारी रुग्णालये खर्च
प्रक्रिया मोफत
डॉक्टरांचा सल्ला मोफत
सोनोग्राफी मोफत
सर्व चाचण्या मोफत
एका महिन्यात तीन सायकल ९० हजार रुपये
एका वेळेस ३० हजार रुपये
सायन रुग्णालय आकडेवारी
आययूआय नोंद - ६५० जोडपी
आययूआय प्रक्रिया - २०० महिला
एकूण पॉझिटिव्ह - ६०
आयव्हीएफसाठी नोंद - ८०
सायन रुग्णालयाअंतर्गत असणाऱ्या धारावी आयव्हीएफ केंद्रात डे केअर सुविधा असून चार खाटा उपलब्ध आहेत. या केंद्रात फक्त गर्भधारणाच नाही तर पुरुषांच्या शुक्राणूंचा दर्जा सुधारावा, यासाठीही उपचार दिले जातात. पुढच्या १५ दिवसांत आम्हाला आयव्हीएफ परवाना मिळण्याची अपेक्षा आहे.
- डॉ. अर्चना भोसले, सहाय्यक प्राध्यापक, स्त्रीरोगतज्ज्ञ विभाग, सायन रुग्णालय
आम्ही प्रथम प्रत्येक वंध्यत्व रुग्णाला आययूआय करतो. ३० ते ३५ वयोगटातील महिलांमध्ये आयव्हीएफचे प्रमाण वाढले आहे. आम्हाला आयव्हीएफचा परवाना मिळाला नाही.
- डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय
तरुण महिलांमध्ये स्त्रीबीज साठा कमी होत आहे. महिलांनी वेळोवेळी प्रजनन आरोग्याची तपासणी केली पाहिजे.
- डॉ. सुलभा अरोरा, क्लिनिकल डायरेक्टर, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.