टिळक पूल आणि भायखळा पूलाचे काम वेगात
शहरातील महत्त्वाच्या पुलांमुळे वाहतूक कोंडी फुटणार
टिळक आणि भायखळा पुलांचे काम वेगात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : दादर येथील टिळक आणि भायखळा या महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या पुनर्विकासाची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. पुलांच्या कामासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या इजन्सीची नेमणूक केली आहे. या पुलाच्या कामात रेल मंत्रालय आणि राज्य शासनाची संयुक्त भागीदारी आहे. या पुलांचे काम वेगात सुरू असून, दाेन्ही पूल वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याची माहिती पालिकेच्या पूल अभियंता विभागाने दिली आहे.
भायखळा उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२१ला सुरू झाले. ऑक्टोबर २०२३पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र पुलाचे काम धीम्यागतीने सुरू असल्याने उड्डाणपुलाची अंतिम मुदत जुलै २०२४ निश्चित करण्यात आली. काम पूर्ण न झाल्याने ऑक्टोबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली. दरम्यान, मुंबईतील दादर येथे १०० वर्षे जुन्या टिळक पुलाचे कामदेखील वेगाने सुरू आहे. नवीन पूल जुन्या टिळक पुलाच्या समांतर बांधला जात आहे. तो नवीन पूल बांधला जाईपर्यंत वाहतुकीसाठी खुला राहील. टिळक पूल नवीन रचनेत ६०० मीटर लांब असेल आणि त्यात सहा वाहनांसाठी लेन असतील, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाने दिली. पुलावर अत्याधुनिक सजावटीसाठी एलईडी विद्युत दिवे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पुलाच्या आकर्षणात भर पडेल, असेही त्यांनी सांगितले.
...........
पुढच्या वर्षी पूल पूर्ण होणार
हा पूल दोन टप्प्यांत बांधला जात असून, पहिला टप्पा एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या टप्प्यात पूर्व-पश्चिम दोन्ही वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारे तीन वाहनांचे मार्ग असतील. हा भाग तयार झाल्यानंतर जुना पूल पाडला जाईल आणि दुसरा टप्पा आणखी १८ महिन्यांत बांधून अंदाजे २०२८पर्यंत पूल तयार होईल. आजपर्यंत पुलाचे सर्व पायाभूत काम पूर्ण झाले आहे, तर गर्डर लाँचिंग आणि सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतिपथावर असल्याचे पालिकेने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.