वीज दाबवाढीचा फटका

वीज दाबवाढीचा फटका

Published on

उल्हासनगर, ता. २४ (बातमीदार) : उल्हासनगरातील कुर्ला कॅम्पसह आसपासच्या परिसरात अचानक विद्युत प्रवाहाचा दाब प्रचंड वाढल्याने नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, पंप मोटर्स, राउटर, स्विच बोर्ड, दिवे यांसारखी विजेची उपकरणे जळून गेल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी काँग्रेसने महावितरणकडे पंचनामा करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुर्ला कॅम्प, पाण्याच्या टाकीजवळ, हनुमान मंदिर परिसर, रवींद्रनगर, तानाजीनगर आणि ब्लॉक एरिया या भागातील अनेक घरांमध्ये वीज दाबवाढीमुळे उपकरणे पूर्णतः निकामी झाली. नागरिकांनी वेळेवर वीजबिले भरले असतानाही ही घटना घडल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी महावितरणचे अंबरनाथ येथील कार्यकारी अभियंता प्रवीण सकोले यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन. व्ही. मार्लेगावकर यांना निवेदन दिले. त्यामध्ये तत्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची; तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण वीज यंत्रणेची तपासणी व दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, अनेकांनी वैयक्तिकरित्या आपल्या नुकसानाची माहिती महावितरण कार्यालयाकडे दिली असली, तरी अद्याप अधिकृत पंचनामा किंवा मदतीचे कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. नागरिक आर्थिक व मानसिक त्रासातून जात असताना महावितरणने तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

... अन्यथा रस्त्यावर उतरणार
नागरिक वेळेवर वीजबिल भरत आहेत. तरीही नुकसान सहन करावे लागते. हे निष्काळजी कारभाराचे लक्षण आहे. भरपाई न दिल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे रोहित साळवे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com