एमडी पावडरप्रकरणी मध्यप्रदेशच्या तरुणाला अटक
एमडी पावडरप्रकरणी मध्यप्रदेशच्या तरुणाला अटक
६६२ग्रॅम एमडीसह कार असा एक कोटींचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.२६ : भिवंडीकडून मुंब्र्याकडे जाणाऱ्या वाहिनीवरील बंद असलेल्या खारीगाव टोलनाक्याजवळ कारमधून एमडी क्रिस्टल (मेफेड्रॉन) पावडर विक्रीप्रकरणी एकाला अटक केली. यामध्ये मध्यप्रदेशमधील शाहरुख सतार मेवासी उर्फ रिजवान (२८) या मिस्त्रिकाम करणाऱ्या तरुणाला ठाणे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६६२ ग्रॅम वजनाच्या एमडी पावडर सापडली आहे. त्याच्याकडील मुद्देमालासह मोबाईल फोन, रोख रक्कम आणि कार असा एक कोटी पाच लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी (ता. २४) रात्री करण्यात आली. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
भिवंडीकडून मुंब्र्याकडे जाणाऱ्या वाहिनीवरील बंद असलेल्या खारीगाव टोलनाक्याजवळ कारमधून एक जण एमडी पावडर विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ५६ ग्रॅम वजनाचा एमडी आणि कारमध्ये ६०६ ग्रॅम वजनाचा एमडी पावडर ताब्यात घेण्यात आली. ६६२ ग्रॅम पावडरची किंमत ९२ लाख ६८ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून मुद्देमालासह १२ लाखांची कार, २० हजारांचा मोबाईल फोन आणि रोख सात हजार असा एक कोटी ४ लाख ९५ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात तक्रारदार तथा पोलिस नागराज सोनकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मेवासी याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयाने येत्या ३० जुलै पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
------------------------------------
एक किलोची डिलिव्हरी केल्याचे तपासात समोर...
अटकेतील शाहरुख याने ठाणे शहरात येण्यापूर्वीच मध्यंतरी एका ठिकाणी एक किलो एमडी पावडरची डिलिव्हरी केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र नेमकी कोणाला ती डिलिव्हरी केली हे समजू शकले नसून त्या दृष्टीने शोध सुरू आहे.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.