नवी मुंबईत साथीच्या आजारांवर नियंत्रण
नवी मुंबईत साथीच्या आजारांवर नियंत्रण
हिवताप, डेंगीचे रुग्ण घटले
वाशी, ता. २७ (बातमीदार) ः नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यंदा ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ अभियानाची विविध उपक्रमांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सन २०२५ मध्ये हिवताप, डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १ जानेवारी ते २१ जुलै २०२४ या कालावधीत हिवतापाचे २८ रुग्ण, तर डेंगीचे ३७९ संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यातील नऊ रुग्णांना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले होते, तर यंदा १ जानेवारी ते २१ जुलै २०२५ या कालावधीत हिवतापाचे २४ रुग्ण आढळून आले होते, तर डेंगीचे ३२६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी फक्त दोन जणांना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नवी मुंबई महानरगपालिकेच्या आरोग्य विभागांच्या आकडेवारीवरून हिवताप व डेंगीच्या रुग्णांची संख्या २०२४ च्या तुलनेत सन २०२५ मध्ये घटली असल्याचे दिसून येत आहे.
शिबिरांचे आयोजन
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मॉन्सून सुरू होण्याआधीपासूनच २५ एप्रिलपासून साथरोग व कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती करण्याकरिता २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात सातत्याने ३८८ जनजागृती शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिरांना एक लाख ३४ हजार ८६५ नागरिकांनी भेट दिली असून, आठ हजार ५९९ नागरिकांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
पालिका क्षेत्रात जनजागृती
या शिबिरांमध्ये नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेसोबतच घरातील स्वच्छता, सोसायटी परिसरातील स्वच्छता व आजूबाजूची स्वच्छता यावर भर दिल्यास हिवताप, डेंगी, साथरोग यासारखे आजार दूर राहतील. यावर विशेष भर देत व्यापक जनजागृती करण्यात आली आहे, तर त्याचप्रमाणे हिवताप व डेंगी व साथरोग आजाराबाबत अधिक जनजागृती होण्याकरिता नमुंमपा कार्यक्षेत्रात ७८ नमुंमपा व खासगी शाळांमध्ये १६ हजार ९२९ शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या सभांचे आयोजन केले आहे. त्यामुळे यंदा हिवताप व डेंगीच्या रुग्णांची संख्या घटल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.