जाहिरात मजूकर

जाहिरात मजूकर

Published on

राजेश मपारा वाढदिवस - रायगड टुडे पहिले अर्धे पान जाहिरात मजकूर
-------------

माणुसकीचा महामेरू : राजेश मपारा


ध्येयाच्या पाऊलखुणांवर,
ठाम मन, अढळ विश्वास;
समाजसेवेच्या वाटेवर,
तेजस्वी त्याचा प्रकाश!

‘प्रथम राष्ट्र, मग पक्ष, स्वतः शेवटी!’
हा संस्कार हृदयी घेउनी,
भगव्या ध्वजाची सेवा करतो,
निष्ठेची ज्योत पेटवुनी!

सुधागडच्या भूमीतून उभारली,
व्यवसायाची अजरामर इमारत;
राजकारणातील झेपांनी गढली,
जनतेच्या मनात अमिट छाप!

शेतकऱ्यांचे हित, विद्यार्थ्यांचे स्वप्न,
आरोग्य, क्रीडा, कलांची जोपासना;
श्री. बल्लाळेश्वर व हटाळेश्वराच्या छायेत श्रद्धा अखंड,
सर्वधर्मसमभावाची कास उरी!

मैत्रीचा माणूस, मदतीचा हात,
नि:स्वार्थ भावनेचा सागर;
प्रशासनावरची पकड अढळ,
कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक अग्रगण्य!

वैशालीच्या साथीतून साकारले,
सामाजिक बांधिलकीचे आदर्श;
ऐश्वर्या-उत्कर्षाच्या हास्यात सापडले,
ऊर्जेचे अक्षय्य स्रोत!

५० वर्षांच्या जीवनप्रवासात,
केले अनेक यशस्वी आरोहण;
आता पुढच्या पथावर घेउनी साथ,
‘माणुसकी हा खरा धर्म!’ हेच ते ब्रीद वचन!

------------------------------------------


फूल फुलते
ज्योती अखंडितपणे तेवते
आयुष्यात अनेक लोक भेटतात
नकळत नाती जुळतात
पण आपल्यासारखे लोक दुर्मिळच असतात

सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ज्यांनी आपल्या समाजकारण आणि राजकारणाची सुरुवात केली, दिलेला शब्द पाळणे, विश्वासाला पात्र राहणे आणि निष्ठा ज्यांच्या रक्तातच आहे; सर्वसामान्यांच्या वेदना पाहून त्यांच्याप्रति मन हेलावणारा एक तरुण मित्र, समोर आलेल्या संकटात लोकांसाठी धावणारा, मदत करूनही त्यावर भाष्य न करण्याची वृत्ती असणारा, जनमानसातील राजा माणूस
राजेशजी नीता शरद मपारा
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक : श्रेयश कदम व सागर मोरे
----------------------
यशस्वी वाटचाल
राजेश नीता शरद मपारा यांच्या कारकिर्दीचा आलेख थक्क करणारा आहे. त्यांना घरातूनच व्यवसायाचे बाळकडू मिळाले. घरची सुस्थिती असतानादेखील समाजाप्रति आपण काही देणं लागतोय, लोकांच्या अडीअडचणी सोडवणे हे आपले महत्त्वाचे कामच आहे अशी भावना घेऊन राजेश मपारा यांनी महाविद्यालयीन जीवनापासून आपल्या सामाजिक आयुष्याला सुरुवात केली. पालीतील ग. बा. वडेर हायस्कूल येथे शालेय शिक्षण व शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालयात त्यांचे उच्च शिक्षण झाले. नेतृत्व गुण हा पहिल्यापासूनच त्यांच्यामध्ये असल्यामुळे महाविद्यालयात असताना महाविद्यालयातील जीएसची निवड ही नेहमी त्यांच्याच नेतृत्वाखाली चाणक्षपणे झालेली दिसली. वडिलांचा व्यवसाय सांभाळताना त्यांनी तो कशाप्रकारे आणखी वाढेल या दृष्टीने प्रयत्न केला आणि त्याचबरोबर त्यांनी राजकारणामध्येही झेप घेतली. राजकारणातही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्व व प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर अनेक पदे भूषवली. पाली गावचे सरपंच ते जिल्हा उपाध्यक्ष-भारतीय जनता पार्टी (दक्षिण रायगड) आणि भाजप महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य आदी पदे भूषवली व भूषवत आहेत. राजकारणाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय पदे भूषवली आहेत. ते डॉ. मो. वि. पुरोहित या पालीतील १०० वर्षे जुन्या वाचनालयाचे अध्यक्ष आहेत. पाली व्यापारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक तसेच हटाळेश्वर मंदिर ट्रस्ट, पाली मुख्य विश्वस्त आहेत. सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com