आडोशी बोगद्यात ट्रकची 
२४ वाहनांना धडक

आडोशी बोगद्यात ट्रकची २४ वाहनांना धडक

Published on

आडोशी बोगद्यात ट्रकची
२४ वाहनांना धडक

विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू; १९ जण जखमी

खोपोली/खालापूर, ता. २६ (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्यात शनिवारी (ता. २६) दुपारी पावणेदोनच्या सुमारास ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने २४ वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात अनिता सहदेव एकंडे या महिलेचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत.

आडोशी बोगद्यात ब्रेक निकामी झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकवरील चालक राजेशकुमार पटेल (रा. उत्तर प्रदेश) यांचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. उतार असल्याने अनियंत्रित झालेल्या ट्रकने एक मिनी बस, २३ कार आणि एका ट्रकला धडक दिली. घटनेची माहिती मिळताच द्रुतगती मार्गावरील सर्व यंत्रणा, हेल्प फाउंडेशन, खोपोली पोलिस यंत्रणेने तातडीने मदतकार्य सुरू केले. काही जखमींना खोपोली येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय आणि पुण्यातील लोकमान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
---
दीड तासानंतर वाहतूक सुरळित
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील अपघातग्रस्त वाहने आयआरबीच्या हायड्रा आणि एका खासगी क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आली. त्यानंतर जवळपास दीड तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली. यामुळे धिम्या गतीने वाहतूक पुढे सरकत असल्याने प्रवाशांचे हाल झाले.


-------------------
फोटो ओळ
खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील विचित्र अपघातानंतर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (छायाचित्र : अनिल पाटील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com