मुंबई लोकल अपघातात किंचित घट

मुंबई लोकल अपघातात किंचित घट

Published on

मुंबई लोकल अपघातांत किंचित घट
पाच महिन्यांत ९२२ प्रवाशांचा मृत्यू; रूळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू

सकाळ वृत्तसेवा  
मुंबई, ता.२७ : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल गाड्यांमध्ये होणारे अपघात आजही चिंतेचा विषय ठरत आहेत. उपनगरी रेल्वे मार्गावर जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत एकूण ९२२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. २०२४मध्ये याच कालावधीत ही संख्या १,००३ इतकी होती. मृत्यूंच्या संख्येत थोडीशी घट झाली असली तरीही परिस्थिती अजूनही गंभीर आहे.

रेल्वे प्रशासनाकडून माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार, यातील ४६१ जणांचे मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना, तर २१० जणांचे मृत्यू धावत्या लोकलमधून पडल्यामुळे झाले. ही दोन्ही कारणे पूर्णपणे टाळता येण्याजोगी असूनही हलगर्जी, शॉर्टकटचा मोह आणि वेळेची घाई या सवयींमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या मृत्यूंपैकी ५९७ मध्य रेल्वे, तर ३२५ पश्चिम रेल्वे मार्गावर झाले.  रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. स्वयंचलित दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे, वाढीव फेऱ्या आणि जनजागृती मोहीम सुरू आहे. मात्र हे उपाय फक्त यंत्रणा पातळीवर आहेत. खरी सुरक्षितता प्रवाशांच्या सजगतेत आणि शहाणपणात आहे.  


मृत्यू मार्गावरील आकडेवारी 
रेल्वे रूळ ओलांडताना : ४६१ मृत्यू
धावत्या गाडीतून पडून : २१० मृत्यू
अन्य कारणे : २५१ मृत्यू
एकूण : ९२२ मृत्यू

मार्गानुसार आकडेवारी
मध्य रेल्वे : ५९७ मृत्यू
पश्चिम रेल्वे : ३२५ मृत्यू


रेल्वेचे आवाहन
रेल्वे रूळ ओलांडू नका.
फूटओव्हर ब्रिज/सबवेचा वापर करा.
धावत्या गाडीत चढू नका.
दरवाजाजवळ लटकू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com